IND vs WI: ‘आता फक्त मॅच सुरु होऊं दे’, पोलार्डच्या संघाला रोहित शर्माने दिला इशारा

| Updated on: Feb 02, 2022 | 4:50 PM

वेस्ट इंडिजचा संघ भारतात दाखल होताच टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे.

1 / 5
वेस्ट इंडिजचा संघ भारतात दाखल होताच टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. सामना खेळण्यासाठी आपण किती उत्सुक आणि अधीर आहोत, ते त्याने दाखवून दिलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने वेस्ट इंडिजच्या संघापर्यंत संदेश पोहोचवलाय. (Photo: Instagram/Rohit Sharma)

2 / 5
आता आणखी वाट पाहू शकत नाही, असे रोहितने त्याच्या संदेशात म्हटलं आहे. (Photo: Instagram/Rohit Sharma)

3 / 5
भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये तीन वनडे सामन्यांची मालिका 6 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. सीरीजमधला पहिला सामना हा भारताचा 1000 वा वनडे सामना असणार आहे. 1000 वी वनडे मॅच खेळणारा भारत जगातील पहिला देश ठरणार आहे. ज्या सामन्यात कर्णधारपद रोहित शर्मा भूषवणार आहे. (Photo: AFP)

4 / 5
 टीम इंडियाचा पूर्णवेळ वनडे आणि टी 20 कॅप्टन झाल्यानंतर रोहित शर्माची ही पहिली वनडे सीरीज आहे. याआधी 10 वनडे सामन्यांमध्ये त्याने कर्णधारपद भूषवलं आहे. ज्यात आठ वनडे जिंकल्यात तर दोघांमध्ये पराभव झाला. (Photo: AFP)

5 / 5
नव्या वर्षात भारताला अजून एकही विजय मिळवता आलेला नाहीय. वेस्ट इंडिज विरुद्धच्या वनडे मालिकेत रोहित शर्माकडून चाहत्यांना विजयाची अपेक्षा असेल. (Photo: AFP)