IND vs WI: सामन्यानंतर रोहित शर्माला नाराजी लपवता आली नाही, म्हणाला….

| Updated on: Feb 19, 2022 | 9:00 AM

IND vs WI: भारताने काल इडन गार्डन्सवर (Eden gardens) झालेला दुसरा टी-20 सामना जिंकून मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. विराट कोहली, (Virat kohli) ऋषभ पंत, (Rishabh Pant) आणि वेंकटेश अय्यरने दमदार फलंदाजी केली.

IND vs WI: सामन्यानंतर रोहित शर्माला नाराजी लपवता आली नाही, म्हणाला....
India vs West Indies: Rohit Sharma Back As Captain, Ravi Bishnoi Earns Maiden Call Up For ODI and T20 Series
Follow us on

कोलकाता: भारताने काल इडन गार्डन्सवर (Eden gardens) झालेला दुसरा टी-20 सामना जिंकून मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. विराट कोहली, (Virat kohli) ऋषभ पंत, (Rishabh Pant) आणि वेंकटेश अय्यरने दमदार फलंदाजी केली. डेथ ओव्हर्समध्ये भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेलने टिच्चून केलेला मारा यामुळे भारताला हा सामना जिंकता आला. शेवटच्या षटकापर्यंत श्वास रोखून धरायला लावणारा हा सामना भारताने आठ धावांनी जिंकला. भारताने याआधी तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत क्लीन स्वीप केलं. भारताने ही वनडे सीरीज 3-0 अशी जिंकली. टी-20 सीरीजमध्येही असंच क्लीन स्वीप करण्याचा भारताचा प्रयत्न असेल. रविवारी होणारा सामना फक्त औपचारीकता मात्र आहे. भारत तिसऱ्या टी 20 सामन्यात बदल करु शकतो. कारण मालिका भारताने आधीच जिंकली आहे.

रोहित-राहुल जोडीची चिंता नक्कीच वाढली असणार

दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताचं ढिसाळ क्षेत्ररक्षण दिसून आलं. भारतीय फिल्डर्सनी मैदानावर सोपे झेल सोडले. त्यामुळे रोहित-राहुल जोडीची चिंता नक्कीच वाढली असणार. क्रिकेटमध्ये कॅचेस विन मॅचेस असं म्हटलं जातं. मोक्याच्या क्षणी रवी बिश्नोई आणि भुवनेश्वर कुमारने सेट झालेल्या वेस्ट इंडिजच्या फलंदाजांचे सोपे झेल सोडले. त्यामुळे कर्णधार रोहित शर्माला सामन्यानंतरही आपली नाराजी लपवता आली नाही.

रोहितची नाराजी दिसली

सामन्यानंतर प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये बोलताना रोहित शर्मा फलंदाज आणि गोलंदाजांवर नाराज नव्हता. त्याने फलंदाज आणि गोलंदाज दोघांची स्तुती केली. हा सांघिक प्रयत्नांचा विजय असल्याचं रोहितने म्हटलं. रोहित शर्माची नाराजी फिल्डिंगवर होती. रोहित शर्मा क्षेत्ररक्षणावर नाराज होता. रोहितच्या मते खराब फिल्डिंगमुळे सामना शेवटच्या षटकापर्यंत पोहोचला. सामन्यामध्येही रोहितची ही नाराजी स्पष्टपणे दिसून आली.

आधी चिडला मग भुवनेश्वरच कौतुक

“वेस्ट इंडिज विरुद्ध खेळताना नेहमी मनात एक भिती असते. हा सामना सोप नसणार आहे, हे आम्हाला सुरुवातीपासून माहित होतं. पण दबावाखाली आम्ही आमच्या योजनांची अमलबजावणी करु शकलो, याचा अभिमान आहे. भुवनेश्वर कुमारचं षटक खूप महत्त्वाचं होतं. तिथे त्याच्या अनुभवाचा फायदा झाला. भुवी अनेक वर्षापासून अशीच गोलंदाजी करतोय आणि आमचा त्याच्यावर विश्वास आहे” अशा शब्दात रोहितने भुवनेश्वरच कौतुक केलं. “विराटने आज ज्या पद्धतीने सुरुवात केली. त्यामुळे माझ्यावर दबाव उरला नाही. विराटची ही खूप महत्त्वाची खेळी होती. पंत आणि अय्यरने सुंदर शेवट केला. वेंकटेश अय्यरच्या फलंदाजीत परिपक्वता पाहून मनाला समाधान मिळालं. अपेक्षित फिल्डिंग झाली नाही. त्यामुळे निराश झालो. आम्ही ते झेल घेतले असते, तर सामन्याचं चित्र वेगळं दिसलं असतं” असे रोहितने सांगितलं.

india vs west indies rohit sharma angry on ravi bishnoi over drop catches virat kohli rishabh pant