मुंबई: तब्बल 6 महिन्यानंतर पुनरागमन करणाऱ्या दीपक चाहरला (Deepak Chahar) दुसऱ्या वनडेत संधी दिलेली नाही. पहिल्या सामन्यात त्याने आपल्या धारदार गोलंदाजीच प्रदर्शन केलं होतं. दीपक चाहरच्या जागी शार्दुल ठाकूरचा (Shardul Thakur) संघात समावेश करण्यात आला आहे. सीरीज मध्ये भारतीय संघ सध्या 1-0 ने आघाडीवर आहे. भारतीय संघ दुसरा सामना जिंकून सीरीज जिंकण्याचा प्रयत्न करेल. भारताचा कॅप्टन केएल राहुलने (KL Rahul) टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टॉसच्या वेळी कॅप्टनने चाहरला बाहेर बसवण्या मागच्या निर्णयाची माहिती दिली नाही. भारताने चाहरच्या रुपात एकमेव बदल केलाय. तेच झिम्बाब्वेच्या टीमने संघात दोन बदल केले आहेत. झिम्बाब्वेच्या टीम मध्ये ताकुडज्वानाशे काइटानो आणि तनाका चिवांगाचा समावेश झाला आहे.
सुरुवातीला आम्हाला विकेट मिळतील, असा आशावाद केएल राहुलने व्यक्त केला. पहिल्या सामन्यात आम्ही शानदार गोलंदाजी केली होती. एकही कॅच सोडली नाही. कुठलीही संधी वाया दवडली नाही. चेंडू जुना झाल्यानंतर झिम्बाब्वेच्या इव्हान्स आणि नगारवाने पहिल्या वनडेत शानदार फलंदाजी केली होती. इव्हान्स पहिल्या सामन्यात नाबाद 33 आणि नगारवाने 34 धावा केल्या होत्या. टीम इंडियाने हा सामना 10 विकेटने जिंकला होता.
A look at our Playing XI ?
One change for #TeamIndia. Shardul Thakur comes in place of Deepak Chahar.
Live – https://t.co/6G5iy3rRFu #ZIMvIND pic.twitter.com/JAmJ6HxmGu
— BCCI (@BCCI) August 20, 2022
दीपक चाहरने मागच्या सामन्यात जवळपास सहा महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय सामन्यात पुनरागमन केलं होतं. दुखापतीमुळे तो आयपीएलच्या संपूर्ण मोसमाला मुकला होता. पहिल्या सामन्यात त्याने 27 धावा देऊन तीन विकेट काढल्या. हा दौरा चाहरसाठी फिटनेस सिद्ध करण्याची संधी आहे. टी 20 वर्ल्ड कपच्या संघ निवडीला आता फार वेळ उरलेला नाही. चाहरकडे फिटनेस आणि फॉर्म दाखवून ऑस्ट्रेलियाचं तिकीट पक्क करण्याची एक संधी आहे. आता दुसऱ्या वनडेतून बाहेर गेल्यामुळे त्याच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. दुखापतीमुळे त्याला बाहेर बसवल्याची चर्चा आहे. चाहरला संघाबाहेर ठेवण्याबद्दल अजून कुठलही अधिकृत कारण समोर आलेलं नाही.
टीम इंडियाची प्लेइंग इलेवन: शिखर धवन, शुभमन गिल, इशान किशन, केएल राहुल, दीपक हुड्डा, संजू सॅमसन, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्म सिराज