मेलबर्न: टीम इंडिया आज टी 20 वर्ल्ड कपमधील सुपर 12 राऊंडमधला शेवटचा सामना खेळणार आहे. नेदरलँड्सने आज दक्षिण आफ्रिकेचा धक्कादायक पराभव केला. त्यामुळे टीम इंडिया आधीच सेमीफायनलमध्ये पोहोचली आहे. टीम इंडिया झिम्बाब्वेला कमी लेखण्याची चूक करणार नाही. टीम इंडिया आपली विजयी लय कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. आजची मॅच जिंकून पॉइंट्स टेबलमध्ये टीम इंडिया टॉपवर राहण्याचा प्रयत्न करेल.
कोणी जिंकला टॉस
भारताचा कॅप्टन रोहित शर्माने टॉस जिंकला असून टीम इंडियात आज एक बदल करण्यात आला आहेा. दिनेश कार्तिक ऐवजी ऋषभ पंतचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. टीम इंडियाने पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.
…तर अजून इंटरेस्ट निर्माण झाला असता
टीम इंडियाने सुपर 12 राऊंडमध्ये फक्त एकाच पराभवाचा सामना केलाय. दक्षिण आफ्रिकेशिवाय एकाही टीमने टीम इंडियाला हरवलेलं नाही. दक्षिण आफ्रिकेने नेदरलँड्सला हरवलं असतं, तर ग्रुप 2 राऊंडमध्ये अजून इंटरेस्ट निर्माण झाला असता. पण असं होऊ शकलं नाही.
सेमीफायनलमध्ये भारताचा सामना कोणाबरोबर?
न्यूझीलंड, इंग्लंडनंतर टीम इंडिया सेमीफायनलमध्ये पोहोचणारी तिसरी टीम ठरली आहे. टीम इंडियाने आज झिम्बाब्वेला हरवल्यास इंग्लंडबरोबर सेमीफायनलमध्ये सामना होऊ शकतो. ग्रुप 1 मधील टॉप टीम ग्रुप 2 मधील दुसऱ्या स्थानावरील टीम बरोबर आणि ग्रुप 2 मधील टॉप टीम ग्रुप 1 मधील दुसऱ्या स्थानावरील टीम बरोबर खेळणार आहे.
T20 WC 2022. India XI: R Sharma (c), K L Rahul, V Kohli, S Yadav, R Pant (wk), H Pandya, A Patel, R Ashwin, A Singh, B Kumar, M Shami. https://t.co/shiBY8Kmge #INDvZIM #T20WorldCup
— BCCI (@BCCI) November 6, 2022
तब्बल 7 धक्कादायक निकाल
सध्या ग्रुप 1 मध्ये न्यूझीलंड पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या स्थानावर आहे. टीम इंडिया आज प्लेइंग 11 मध्ये बदल करण्याची शक्यता कमीच आहे. मागच्या सामन्यातील विनिंग कॉम्बिनेशन कायम राखलं जाईल अशी शक्यता आहे. ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये एक-दोन नाही, तब्बल 7 धक्कादायक निकालाची नोंद झाली आहे.
भारत: रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत (विकेटकीपर), अक्षर पटेल, आर अश्विन, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, भुवनेश्वर कुमार,