षटकार ठोकून संजू सॅमसनने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. झिम्बाब्वे विरुद्ध तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. नाणेफेक जिंकून केएल राहुलने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी हा निर्णय योग्य ठरवला. झिम्बाब्वेच्या संघाला 161 धावांवर रोखलं. भारताने विजयासाठीच लक्ष्य 25.4 षटकात पाच विकेट गमावून पूर्ण केलं. भारताने हा सामना पाच विकेटने जिंकला. भारताकडून संजू सॅमसनने सर्वाधिक नाबाद 43 धावा केल्या. यात 3 चौकार आणि 4 षटकार आहेत. शिखर धवन (33), शुभमन गिल (33) यांनी प्रत्येकी 33 धावा केल्या. दीपक हुड्डा 25 धावांवर बाद झाला. पुनरागमनानंतर दुसरा सामना खेळणारा कॅप्टन केएल राहुल स्वतात 1 रन्सवर बाद झाला. गोलंदाजांमध्ये शार्दुल ठाकूर यशस्वी ठरला. त्याने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. अन्य गोलंदाजांनी प्रत्येकी एक विकेट काढून साथ दिली. तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत भारताकडे आता 2-0 विजयी आघाडी आहे.

2ND ODI. India Won by 5 Wicket(s) https://t.co/RDdvgajdmi #ZIMvIND
— BCCI (@BCCI) August 20, 2022
17 षटकानंतर भारताच्या 4 बाद धावा 115 झाल्या आहेत. शुभमन गिल 33 आणि इशान किशन 6 धावांवर आऊट झाला. आता संजू सॅमसन आणि दीपक हुड्डाची जोडी मैदानात आहे.
शिखर धवनच्या रुपाने भारताला दुसरा झटका बसला आहे. धवन 33 धावांवर बाद झाला. चिवांगाच्या गोलंदाजीवर त्याने कायाकडे सोप झेल दिला. 6.3 षटकात भारताच्या दोन बाद 47 धावा झाल्या आहेत.
6 षटकात भारताच्या एक बाद 41 धावा झाल्या आहेत. शिखर धवन 27 आणि शुभमन गिल 7 धावांवर खेळतोय.
केएल राहुलच्या रुपाने भारताला पहिला झटका बसला आहे. राहुल अवघ्या 1 रन्सवर न्याउचीच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. 2.2 षटकात भारताच्या 12/1 धावा झाल्या आहेत.
दुसऱ्या वनडे मध्ये झिम्बाब्वेचा डाव 161 धावात आटोपला. झिम्बाब्वेकडून सीन विल्यमसने सर्वाधिक 42 आणि रायन बर्लने नाबाद 41 धावा केल्या. शार्दुल ठाकूर सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि दीपक हुड्डा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला.
अक्षर पटेलने झिम्बाब्वेला आठवा झटका दिला. ब्रॅड इव्हान्स 9 धावांवर बोल्ड झाला. 37 षटकानंतर झिम्बाब्वेच्या 149/8 धावा झाल्या आहेत.
35 षटकानंतर झिम्बाब्वेच्या 7 बाद 141 धावा झाल्या आहेत. ल्युक जॉन्गवे बाद होणारा शेवटचा फलंदाज ठरला. त्याला 6 धावांवर शार्दुल ठाकूरने क्लीन बोल्ड केलं. आता रायन बर्ल आणि ब्रॅड इव्हान्सची जोडी मैदानात आहे.
30 ओव्हर्सनंतर झिम्बाब्वेच्या 6 बाद 113 धावा झाल्या आहेत. चांगली फलंदाजी करणाऱ्या सीन विल्यमसला दीपक हुड्डाने 42 धावांवर शिखर धवनकरवी झेलबाद केलं.
सिकंदर रजाच्या रुपात झिम्बाब्वेला पाचवा झटका बसला आहे. कुलदीप यादवने रजाला 16 धावांवर इशान किशनकरवी झेलबाद केलं. 21 षटकानंतर झिम्बाब्वेच्या 72/5 अशी स्थिती आहे.
सुरुवातीच्या 4 विकेट लवकर गेल्यानंतर सिकंदर रजा आणि सीन विल्यमसने डाव सावरला. 20 षटकानंतर झिम्बाब्वेच्या चार बाद 69 धावा झाल्या आहेत. रजा 15 धावांवर आणि विल्यमस 23 धावांवर खेळतोय.
ताकुडज्वानाशे काइटानोच्या रुपात भारताला पहिली विकेट मिळाली. सात धावा बनवून तो आऊट झाला. मोहम्मद सिराजला हा विकेट मिळाला. पण त्यात विकेटकीपर संजू सॅमसनचा महत्त्वाचा रोल होता. 12व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर इनोसेंट कायाच्या रुपात भारताला दुसरी विकेट मिळाली. शार्दुल ठाकूरने सॅमसनकरवी त्याला 16 धावांवर झेलबाद केलं. 13 व्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर प्रसिद्ध कृष्णाने वेस्ले मेधेवेरेला आऊट केलं. हा झेलही सॅमसननेच घेतला. त्याने 2 धावा केल्या. कॅप्टन चाकाबावाला ठाकूरने 2 धावांवर शुभमन गिलकरवी झेलबाद केलं. ठाकूरने दोन, सिराज, ठाकूरने प्रत्येकी एक विकेट घेतला. 15 षटकांअखेरीस झिम्बाब्वेची स्थिती 4 बाद 46 आहे.
7 ओव्हर्सचा खेळ पूर्ण झाला असून झिम्बाब्वेच्या बिनबाद 12 धावा झाल्या आहेत. ताकुडज्वानाशे काइटानो आणि इनोसेंट काया ही सलामीची जोडी मैदानात आहे. काइटानो 4 आणि इनोसेंट 5 धावांवर खेळतायत.
भारत आणि झिम्बाब्वे मध्ये दुसरा वनडे सामना सुरु झालाय. ताकुडज्वानाशे काइटानो आणि इनोसेंट काया ही सलामीची जोडी मैदानात उतरली आहे. मोहम्मद सिराजने पहिलं षटक टाकलं. झिम्बाब्वेची बिनाबाद 1 धाव झाली आहे.
भारत- केएल राहुल (कॅप्टन), शुभमन गिल, इशान किशन, दीपक हुड्डा, संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज
A look at our Playing XI ?
One change for #TeamIndia. Shardul Thakur comes in place of Deepak Chahar.
Live – https://t.co/6G5iy3rRFu #ZIMvIND pic.twitter.com/JAmJ6HxmGu
— BCCI (@BCCI) August 20, 2022
भारताचा कॅप्टन केएल राहुलने दुसऱ्या वनडेत टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने आपल्या संघात एक बदल केला आहे. दीपक चाहरच्या जागी शार्दुल ठाकूरला संधी दिली आहे. झिम्बाब्वेच्या संघात दोन बदल झाले आहेत. झिम्बाब्वेच्या टीम मध्ये ताकुडज्वानाशे काइटानो आणि तनाका चिवांगाचा समावेश झाला आहे.