IND vs SL: श्रीलंकेसोबत आज पहिला T20 सामना, टीम इंडियात होणार ‘हे’ महत्त्वाचे बदल, पाहा संभाव्य अंतिम 11

| Updated on: Jul 25, 2021 | 12:48 PM

श्रीलंका दौऱ्यातील एकदिवसीय सामन्यांची मालिका 3-2 च्या फरकाने खिशात घातल्यानंतर आता भारतीय संघ टी-20 सामन्यांसाठी सज्ज झाला आहे. तिन टी-20 सामन्यातील पहिला सामना आज होणार आहे.

IND vs SL: श्रीलंकेसोबत आज पहिला T20 सामना, टीम इंडियात होणार हे महत्त्वाचे बदल, पाहा संभाव्य अंतिम 11
भारतीय संघ
Follow us on

कोलंबो : भारतीय संघ कर्णधार शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्त्वाखाली श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामने खेळवले जाणार होते. ज्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका भारताने 3-2 ने जिंकली आहे. त्यामुळे भारतीय संघ आता टी-20 मालिकेसाठी सज्ज झाला आहे. दरम्यान या टी-20 सामन्यांसाठी भारतीय संंघात काही बदल नक्कीच केले जाणार आहेत. कारण काही टी-20 स्पेशलिस्ट खेळाडूंना एकदिवसीय सामन्यांमध्ये संधी दिली नसल्याने त्यांना यावेळी संधी देण्यात येईल.

श्रीलंका आणि टीम इंडिया यांच्या पहिला T20 सामना आज रात्री 8 च्या सुमारास कोलंबोच्या के. प्रेमदासा मैदानावर सुरु होईल. भारत-श्रीलंका संघाचे कर्णधार तेच असतील जे एकदिवसीय मालिकेसाठी होते. पण संघातील काही खेळाडू मात्र नक्कीच बदलतील. भारत एकदिवसीय मालिकेप्रमाणे टी-20 मालिकाही खिशात घालण्यासाठी तर श्रीलंका संघ एकदिवसीय मालिका गेली असली तरी टी-20 जिंकण्यासाठी संघात महत्त्वाचे बदल करुन रणनीती आखण्यात व्यस्त आहे.

मिडल ऑर्डर आणि गोलंदाजीमध्ये बदल

T20 मालिकेसाठी भारतीय संघ मिडल ऑर्डर आणि गोलंदाजीमध्ये बदल करु शकतो. त्यामुळे सलामीसाठी कर्णधार शिखरसह पृथ्वी शॉच येतील. तर मिडल ऑर्डरमध्ये सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पंड्या, क्रुणाल पंड्या यांना पाठवले जाईल. त्यामुळे एकदिवसीय संघातील मनीष पांडे T-20 संघात फिट बसत नसल्याने त्याच्या जागी यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनला संधी दिली जाऊ शकते. तसेच सूर्यकुमार आणि इशान यांच्यापैकी एकाची जागा देवदत्त पडीक्कल किंवा ऋतुराज गायकवाड घेण्याची शक्यता देखील वर्तविली जात आहे. गोलंदाज कुलदीप यादवच्या जागी मिस्ट्री स्पिनर वरूण चक्रवर्तीला संधी देण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे वरूण चक्रवर्ती स्पिनमध्ये चहलच्या जोडीला असतील.

पहिल्या टी-20 सामन्यासाठी संभाव्य भारतीय संघ

शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, इशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, क्रुणाल पंड्या, संजू सॅमसन, भुवनेश्वर कुमार, दीपक चहार, वरूण चक्रवर्ती, युजवेंद्र चहल

हे ही वाचा

IND vs SL : श्रीलंकेने लाज राखली, अखेरच्या एकदिवसीय सामन्यात भारतावर निसटता विजय

श्रीलंकेतून थेट इंग्लंडमध्ये, सूर्यकुमार यादवला निरोप, आणखी दोन खेळाडू इंग्लंडविरुद्ध मैदानात उतरणार?

IND vs SL : श्रीलंका संघाविरुद्ध 5 खेळाडूंनी केला डेब्यू, 40 वर्षानंतर इतिहासाची पुनरावृत्ती

(India will Play First T20 Match Against Sri lanka at colambo today know predicted team india 11)