मुंबई: न्यूझीलंड संघाने टी20 विश्वचषक तर गमावला पण आता याच न्यूझीलंड संघाने काही महिन्यांपूर्वीच कसोटी क्रिकेट प्रकारातील विश्वचषक असणारी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) स्पर्धा भारताला नमवत जिंकली होती. दरम्यान भारतीय संघाची या मोठ्या पराभवाची जखम अजूनही भरलेली नाही. त्यामुळे आगामी न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी सामन्यांत ही जखम भरुन काढण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. न्यूझीलंडचा संघ भारताच्या दौऱ्यावर येत असून यावेळी टी20 सामन्यांसह 2 कसोटी सामनेही खेळवले जाणार आहेत.
न्यूझीलंड संघासोबत भारताचे सामने 17 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहेत. दरम्यान पहिले 3 टी20 सामने झाल्यानंतर दोन कसोटी सामने सुरु होतील. हे सामने भारतासाठी महत्त्वाचे असणार आहेत. कारण यंदाच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये गुण मिळवण्यासाठी भारताला विजय गरजेचा असून WTC मधील पराभवही भरुन काढणं गरजेचं आहे. या दोन सामन्यात पहिल्या सामन्यावेळी कर्णधार म्हणून अजिंक्य रहाणे संघात असणार आहे. नुकताच बीसीसीआयने कसोटी संघही जाहीर केला आहे.
पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संघ : अजिंक्य रहाणे (कर्णधार), चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, वृद्धिमान साहा, केएस भरत, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, जयंत यादव, ईशांत शर्मा, यू. यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्ण.
भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी मालिका
पहिला सामना, 25 ते 29 नोव्हेंबर, ग्रीन पार्क कानपूर, सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल.
दुसरा सामना, 3 डिसेंबर ते 7 डिसेंबर, वानखेडे स्टेडियम मुंबई, सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल.
WTC Final च्या सामन्यात नाणेफेक जिंकत न्युझीलंडने भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. त्यानंतर पहिल्या डावात न्यूझीलंडच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर भारतीय खेळाडू चांगली कामगिरी करु शकले नाहीत. भारताचा पहिला डाव 217 धावात आटोपला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या न्यूझिलंडच्या संघाने पहिल्या डावात 249 धावा केल्या. तर दुसऱ्या डावात न्यूझिलंडने भारतीय संघाला अवघ्या 170 धावांत गुंडाळलं. न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर भारताचे मातब्बर फलंदाज फार काळ तग धरु शकले नाहीत. भारताचे सर्व फलंदाज काही धावांच्या अंतरावर बाद झाले. भारताचा दुसरा डाव अवघ्या 170 धावांवर आटोपला. त्यामुळे न्यूझीलंडला 139 धावांचं माफक आव्हान मिळालं.जे केवळ 2 विकेट्सच्या बदल्यात पूर्ण करत न्यूझीलंडने भारतावर 8 गडी राखून विजय मिळवला.
इतर बातम्या
T20 WC : डेव्हिड वॉर्नरने कर्णधाराचा शब्द राखला, फिंचने केलेली भविष्यवाणी खरी ठरवली
भारतीय संघाचं प्रशिक्षक पद सोडताच रवी शास्त्रींकडे नवी कामगिरी, लवकरच दिसणार नव्या भूमिकेत
(India will play two test matches against new zeland try to win and take revenge of WTC Final defeat)