कोलंबो : टीम इंडियासाठी आशिया कप 2023 ची सुरुवात चांगली झाली नव्हती. 2 सप्टेंबरला टीम इंडियाचा सामना पाकिस्तान विरुद्ध होता. पण पावसामुळे हा सामना रद्द झाला. या मॅचमध्ये टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरने निराश केलं होतं. त्यानंतर टीम इंडियाचा सामना नेपाळ विरुद्ध होता. ही मॅच टीम इंडियाने आरामात जिंकली. टीम इंडियाने 10 विकेटने हा सामना जिंकला. पण या मॅचमध्ये टीम इंडियाने खराब फिल्डिंग केली. मॅचनंतर रोहित शर्माने याबद्दल चिंता व्यक्त केली होती. 4 सप्टेंबरला हा सामना झाला होता. या मॅचनंतर रोहितने जे म्हटलं होतं, त्याचा परिणाम संपूर्ण टीमवर झाला. त्यानंतर टीम बदलेली दिसली. श्रीलंकेविरुद्ध मंगळवारी झालेल्या सामन्यात हा बदल दिसून आला. टीम इंडियाने मंगळवारी श्रीलंकेला 41 धावांनी हरवलं. या विजयासह टीम इंडियाने आशिया कप 2023 च्या फायनलमध्ये प्रवेश केला.
टीम इंडियाने या मॅचमध्ये मोठी धावसंख्या उभारली नव्हती. पण टीम इंडिया 49.1 ओव्हरमध्ये 213 रन्सवर ऑलआऊट झाली. धावसंख्या कमी असून टीम इंडियाच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. श्रीलंकेची टीम 41.3 ओव्हर्समध्ये 172 रन्सवर ऑलआऊट झाली. नेपाळ विरुद्ध टीम इंडियाने तीन कॅच सोडल्या होत्या. विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि इशान किशनला कॅच पकडता आली नव्हती. ग्राऊड फील्डिंग सुद्धा विशेष नव्हती. पण श्रीलंकेविरुद्ध टीम इंडियाने जबरदस्त फिल्डिंगच प्रदर्शन केलं. चांगल्या कॅच पकडल्या. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि केएल राहुलने सुंदर कॅच पकडल्या. राहुलने या सामन्यात पाथुम निसांकाची जबरदस्त कॅच घेतली.
WHAT A CATCH BY KL RAHUL 🔥
– Bumrah with a beauty…!!!!pic.twitter.com/Q4KPwfi3tt
— Johns. (@CricCrazyJohns) September 12, 2023
रोहित शर्माची जबरदस्त फिल्डिंग
जसप्रीत बुमराह तिसरी ओव्हर टाकण्यासाठी आला. चेंडू निसांकाच्या बॅटच्या कडेला लागून यष्टीपाठी गेला. त्यावेळी विकेटकिपर केएल राहुलने झेप घेऊन शानदार कॅच पकडली. निसांका फक्त 6 रन्सवर पॅव्हेलियनमध्ये परतला. रोहितने श्रीलंकेचा कॅप्टन दासुन शनाकाला पॅव्हेलियनमध्ये पाठवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. रवींद्र जाडेजा 26 वी ओव्हर टाकण्यासाठी आला. त्याने टाकलेला चेंडू शनाकाच्या बॅटची कड घेऊन स्लीपमध्ये गेला. त्यावेळी रोहितने डाइव्ह मारुन कॅच पकडली. शनाकाने फक्त 9 धावा केल्या.