IND vs WI: भारताकडून मालिकेत क्लीनस्वीप, वेस्ट इंडिजवर 3-0 ने दणदणीत विजय

| Updated on: Feb 11, 2022 | 8:51 PM

अहमदाबाद: कर्णधार म्हणून रोहित शर्माने (Rohit sharma) पहिल्याच वनडे सीरीजमध्ये क्लीनस्वीप विजय मिळवला आहे. भारताने वेस्ट इंडिजचा (India vs West indies) 96 धावांनी पराभव करुन मालिकेत 3-0 असा दणदणीत विजय मिळवला. पहिल्या दोन सामन्यांप्रमाणे तिसऱ्या सामन्यातही गोलंदाजांमुळे विजय शक्य झाला. गोलंदाजीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीचा अचूक लाभ उठवला. भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासून वेस्ट इंडिजला दबावाखाली ठेवलं. वेस्ट […]

IND vs WI: भारताकडून मालिकेत क्लीनस्वीप, वेस्ट इंडिजवर 3-0 ने दणदणीत विजय
Follow us on

अहमदाबाद: कर्णधार म्हणून रोहित शर्माने (Rohit sharma) पहिल्याच वनडे सीरीजमध्ये क्लीनस्वीप विजय मिळवला आहे. भारताने वेस्ट इंडिजचा (India vs West indies) 96 धावांनी पराभव करुन मालिकेत 3-0 असा दणदणीत विजय मिळवला. पहिल्या दोन सामन्यांप्रमाणे तिसऱ्या सामन्यातही गोलंदाजांमुळे विजय शक्य झाला. गोलंदाजीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीचा अचूक लाभ उठवला. भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासून वेस्ट इंडिजला दबावाखाली ठेवलं. वेस्ट इंडिजकडून एकही मोठी भागीदारी होऊ शकली नाही. खालच्या फळीतील ओडियन स्मिथने (Odean smith) वेस्ट इंडिजकडून सर्वाधिक 18 चेंडूत 36 धावा केल्या. त्याने जोरदार फटकेबाजी करताना तीन चौकार आणि तीन षटकार लगावले. स्मिथची फटकेबाजी तशी काही उपयोगाची नव्हती, कारण तो पर्यंत खूप उशीर झाला होता. वेस्ट इंडिजच्या सात विकेट गेल्या होत्या व लक्ष्य देखील खूप मोठे होते.

कर्णधार निकोलस पूरनने 34 धावा केल्या. त्याला कुलदीप यादवने स्लीपमध्ये रोहित शर्माकरवी झेलबाद केले. या दोघांव्यतिरिक्त वेस्ट इंडिजकडून एकही फलंदाज आश्वासक फलंदाजी करु शकला नाही. भारताकडून दीपक चहर,  कुलदीप यादवने प्रत्येकी दोन तर मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णाने तीन विकेट घेतल्या. तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना भारताकडून श्रेयस अय्यरने सर्वाधिक (80) धावा केल्या. संघाचा डाव अडचणीत असताना, ऋषभ पंत आणि अय्यरने चौथ्या विकेटसाठी 110 धावांची भागीदारी केली. पंतनेही शानदार फलंदाजी करताना अर्धशतक (56) झळकवलं.
दोघे बाद झाल्यानंतर भारताचा डाव पुन्हा अडचणीत आला होता. पण वॉशिंग्टन सुंदर आणि दीपक चहरने सातव्या विकेटसाठी 53 धावांची भागादीर करुन डाव सावरला. सुंदरने (33) आणि चहरने (38) धावा केल्या.

आघाडीची फळी पुन्हा कोलमडली
भारताची आघाडीची फळी आज पुन्हा एकदा कोलमडली. शिखर धवन (10), रोहित शर्मा (13) स्वस्तात बाद झाले. विराट कोहली तर भोपळाही फोडू शकला नाही. अवघ्या 42 धावात भारताचे तीन फलंदाज तंबूत परतल्यानंतर पंत-अय्यरने सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. त्यांनी चांगल्या चेंडूला मान दिला तसेच खराब चेंडू सीमारेषेपारही धाडले. धावफलक हलता ठेवता वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना वरचढ होऊ दिले नाही. वेस्ट इंडिजकडून जेसन होल्डर सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने चार विकेट घेतल्या. अलझारी जोसेफ आणि हेडन वॉल्शने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

India won Against west indies in three match odi series captain rohit sharmas first series win