मुंबई: जय शाह (Jay Shah) यांची आज बीसीसीआयच्या सचिवपदी फेरनिवड झाली. सचिव पदावर पुन्हा विराजमान होताच त्यांनी पाकिस्तानला दणका दिला आहे. आशिया कप 2023 (Asia cup 2023) आधी जय शाहनी पाकिस्तानला (Pakistan) झटका दिलाय. बीसीसीआयच्या एजीएमची आज मुंबईत बैठक झाली. त्यानंतर त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, काहीही झालं तरी टीम इंडिया खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणार नाही.
हे वृत्त फेटाळून लावलं
याआधी काही मीडिया रिपोर्ट्समध्ये बीसीसीआय टीम इंडियाला पाकिस्तानात पाठवण्यास तयार आहे, असं म्हटलं होतं. आज जय शाह यांनी हे वृत्त फेटाळून लावलं. टीम इंडिया पाकिस्तान विरुद्ध कुठला सामना खेळणार असेल, तर तो न्यूट्रल वेन्यू म्हणजे त्रयस्थ ठिकाणी, हे जय शाह यांनी स्पष्ट केलं.
जय शाह यांचा पीसीबीला झटका
भारत आणि पाकिस्तानच्या टीम्स टी 20 वर्ल्ड कप 2022 मध्ये भिडणार आहेत. या सामन्याला आता फक्त काही दिवस उरलेत. मेलबर्नमध्ये 23 ऑक्टोबरला सामना होईल. पाकिस्तान विरुद्ध सामना खेळण्याआधी जय शाह यांनी पीसीबीला झटका दिला आहे.
आता कुठे होणार टुर्नामेंट?
जय शाह यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. आता पाकिस्तानच्या अडचणी वाढणार आहेत. टीम इंडिया आशिया कपसाठी पाकिस्तानात जाणार नाही. अशा स्थितीत पीसीबीला कुठल्या तिसऱ्या देशात टुर्नामेंट आयोजित करावी लागेल. भारतीय टीम शिवाय आशिया कपमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होऊ शकतं.
17 वर्षापासून टीम इंडिया पाकिस्तानात गेलेली नाही
भारतीय टीम शेवटचं 2005-06 मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर गेली होती. टीम इंडियाने पाकिस्तानला वनडे सीरीजमध्ये 4-1 ने हरवलं होतं. 17 वर्ष झाली असून टीम इंडियाने पाकिस्तानी भूमीवर पाऊल ठेवलेलं नाही. मागच्या 10 वर्षांपासून भारत-पाकिस्तानमध्ये द्विपक्षीय सीरीज झालेली नाही. 2012 मध्ये शेवटचं पाकिस्तानी टीम भारत दौऱ्यावर आली होती. दोन्ही टीम्समध्ये टी 20 आणि वनडे सीरीज झाली होती.