IND vs ENG : भारताचे दोन कसोटी फलंदाज संघात परत, ‘हे’ दोन खेळाडू होणार संघातून बाहेर

| Updated on: Jul 24, 2021 | 6:07 PM

भारतीय संघ इंग्लंड यांच्यात 4 ऑगस्टपासून पाच सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. WTC 23 स्पर्धेतील हा पहिला सामना असणार आहे.

IND vs ENG : भारताचे दोन कसोटी फलंदाज संघात परत, हे दोन खेळाडू होणार संघातून बाहेर
भारतीय संघ
Follow us on

लंडन : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात पाच सामन्याच्या कसोटी मालिकेला 4 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. भारतीय क्रिकेट टीमने (Indian Cricket Team) या महत्त्वाच्या मालिकेपूर्वी सराव म्हणून काउंटी xi संघासोबत डरहम येथे पहिला सराव सामना खेळला. या सामन्याला भारताचा यष्टीरक्षक रिद्धिमान साहा (Wriddhiman Saha) आणि स्टँडबाय सलामी फलंदाज अभिमन्यु ईश्वरन कोरोनाच्या संकटामुळे संघासोबत होते. पण आता या दोघांसह गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांचाही विलगीकरण कालावधी संपल्याने हे तिघेही संघासोबत जोडले गेले आहेत. तर सराव सामन्यात दुखापत झालेला गोलंदाज आवेश खान (Avesh Khan) आणि अष्टपैलू खेळाडू वॉशिंगटन सुंदर (Washington Sundar) या दोघांना विश्रांती देण्यासाठी संघाबाहेर करण्यात आलं आहे.

रिद्धिमान साहा, भरत अरुण आणि अभिमन्यु ईश्वरन हे तिघेही टीम इंडियाचे थ्रोडाउन स्पेशलिस्ट दयानंद गरनी यांच्या संपर्कात आले होते. त्यानंतर गरनी यांना कोरोना झाल्याने या तिघांनाही विलगीकरणात ठेवलं होतं. आता त्यांचा विलगीकरण कालावधी संपला असल्याने तिघेही संघासोबत सामिल झाले आहेत.

24 खेळाडूंपैकी 3 जण दुखापतीमुळे मालिकेबाहेर

भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेपूर्वीच भारताचे तीन युवा खेळाडू दौऱ्यातून बाहेर झाले आहेत. यामध्ये काउंटी xi संघाकडून सराव सामना खेळणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरसह आवेश खानचा समावेश आहे. तर तिसरा खेळाडू वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये (WTC) भारताचा सलामीवीर शुभमन गिल आहे. WTC Final दरम्यान शुभमनला दुखापत झाली होती. त्यामुळे सामन्यानंतर शुभमनने दौऱ्यातून माघार घेत तो मायदेशी परतला आहे.

कोहली आणि रहाणेच्या फिटनेसवरही प्रश्नचिन्ह

भारतीय संघासाठी आणखी चिंतेची बाब म्हणजे संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांच्या फिटनेसबाबतही चर्चा होत आहे. कोहली पाठीच्या त्रासामुळे तर रहाणे पायाला सूज आल्यामुळे सराव सामना खेळले नाहीत. त्यामुळे इंग्लंड सिरीजपूर्वी दोघेही फिट होतील अशी आशा भारतीय क्रिकेटप्रेमी व्यक्त करत आहेत.

इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेचे वेळापत्रक

पहिली कसोटी, 4 ते 8 ऑगस्ट

दुसरी कसोटी, 12 ते 16 ऑगस्ट

तिसरी कसोटी, 25 ते 29 ऑगस्ट

चौथी कसोटी, 2 ते 6 सप्टेंबर

पाचवी कसोटी, 10 ते 14 सप्टेंबर.

अशी आहे टीम इंडिया :

विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर (दुखापतग्रस्त), जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव. केएल राहुल आणि वृद्धिमान साहा

राखीव खेळाडू : अभिमन्यू इश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान (दुखापतग्रस्त) आणि अर्जान नाग्वासवाला.

हे ही वाचा

IND vs ENG : भारताविरुद्ध मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, चार दिग्गज खेळाडूंचे पुनरागमन

IND vs ENG : भारताचा नवखा गोलंदाज, 74 धावा देत 7 विकेट, 24 वर्षांनंतर लॉर्ड्सवर विजय

(Indian Batsman Wriddhiman Saha and Abhimanyu Easwaran Joined Team India for england tour)