लंडन : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातील चौथा कसोटी सामना अंतिम टप्प्यात पोहचला आहे. पाचव्या आणि निर्णायक दिवसाचं पहिलं सेशन संपलं असून काही तासांत सामन्याचा निर्णय सर्वांसमोर येणार आहे. पण सामन्यादरम्यान भारताला युवा स्टार गोलंदाज मोहम्मद सिराजने (Mohammad Siraj) एक मोठी चूक केली आहे. ज्यामुळे भारताला सामना गमावावा लागू शकतो.
इंग्लंडला एका मोठ्या आव्हानाचा पाठलाग करायचा आहे. मात्र त्यांचा सलामीवीर हासिब हमीद (Haseeb Hamid) चांगल्या लयीत दिसून येत आहे. त्याने अर्धशतक पूर्ण केलं असून तो एकहाती विजय मिळवून देऊ शकतो असा खेळ दाखवत आहे. दरम्यान इतक्या सेट फलंदाजाना बाद करायची सोपी संधी सिराजने गमावली आहे. 48 व्या ओव्हरमध्ये रवींद्र जाडेजा गोलंदाजी करत असताना पाचव्या चेंडूवर हमीदने समोरच्या दिशेने चेंडू मारला. यावेळी सिराजजवळ एक अत्यंत सोपा झेल गेला होता. पण सिराजने तो झेल सोडला असून त्यानंतर भारताला अद्यापर्यतं हासिबला बाद करता आलेले नाही. पहिल्या सेशनच्या शेवटी हासिब 62 धावांवर नाबाद आहे. दरम्यान सिराजने सोडलेल्या या व्हिडीओवरुन चाहते कमीलीचे नाराज झाले आहेत. ते व्हिडीओ तसंच फोटो सोशल मीडियावर टाकत सिराजवर टीका करत आहेत.
Mohammad Siraj left such an Easy Catch! ???
Why Miyan, Whyyy!!#MohammedSiraj #Siraj #INDvENG pic.twitter.com/WfJ4AQ6Ws1
— Jonah Abraham ? (@JonahAbraham26) September 6, 2021
मुंबईचा अष्टपैलू खेळाडू शार्दूल ठाकूर (Shardul Thakur) चौथ्या कसोटीत उत्तम खेळ दाखवत आहे. पहिल्या डावात 57 आणि 60 धावा करत भारताची खालची फळी सांभाळणारा शार्दूल गोलंदाजीतही उत्तम कामगिरी करत आहे. सेट फलंदाज रॉरी बर्न्सला बाद करत आजच्या दिवसाची पहिली विकेट शार्दूलनेच भारताला मिळवून दिली आहे.
A huge wicket for #TeamIndia. What a beauty from @imShard!
Round the wicket, gets one to straighten and takes the edge.
Burns departs!
Live – https://t.co/OOZebPnBZU #ENGvIND pic.twitter.com/q6D4w6Gqsq
— BCCI (@BCCI) September 6, 2021
हे ही वाचा
(Indian Bowler Mohammad Siraj Drops Haseeb Hamids Catch See video)