नवी दिल्ली : महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनंतर (Sachin Tendulkar) जर कोणाच्या खेळाकडे भारतीय मन लावून पाहत असतील तर तो म्हणदे विराट कोहली (Virat Kohli). भारताचा लाडका कर्णधार विराट जगातील अव्वल फलंदाजामध्ये मोडतो. पण अलीकडेच त्याला आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये (ICC Test Ranking) मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. तो फलंदाजामध्ये थेट पाचव्या क्रमांकावर घसरला आहे. इंग्लंडच्या कसोटी मालिका सुरु झाल्यानंतर त्याची ही घसरण झाली आहे. यावर बोलताना कोहलीचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा (RajKumar Sharma) म्हणाले, ”विराटची कसोटी रँकिगमधील पाचव्या स्थानावरील घसरण एक दुखद बातमी आहे. मी याबद्दल त्याच्याशी बोलणार आहे.”
ICC ने नुकतीच कसोटी फलंदाजाची जागतिक क्रमवारी जाहीर केली. यामध्ये केन विलियमसन पहिल्या स्थानावर आहे. तर इंग्लंडचा कर्णधार जो रूट दुसऱ्या नंबरवर विराजमान आहे. तिसऱ्या नंबरवर ऑस्ट्रेलियाचा स्टीव स्मिथ आणि चौथ्यावर मार्नस लाबुशेन आहे. ज्यानंतर विराट हा पाचव्या स्थानावर असल्याने कायम टॉप तीनमध्ये असणाऱ्या विराटसाठी हा एक धक्का आहे. विशेष म्हणजे टॉपच्या फलंदाजांमध्ये आणि विराटमध्ये तब्बल 100 गुणांचा फरक आला आहे.
इंडिया न्यूजशी बोलताना विराटचे कोच राजकुमार शर्मा म्हणाले, ”मला नाही वाटत विराटला कोणत्याच पाठिंब्याची गरज आहे. तो खूप उत्साही असून शेवटच्या सामन्यातही तो चांगल्या फॉर्ममध्ये होता. त्यानंतर लॉर्ड्सवरील विजयामुळे तर त्याचा आनंदर द्विगुणीत झाला असल्याने लवकरच तो एक दमदार शतक ठोकेल हे नक्की.”
विराटचे प्रशिक्षक वर्मा जो रुटबाबत बोलताना म्हणाले, ”विराटसाठी रुट कोणतीच स्पर्धा नाही. रुट एक अप्रतिम खेळाडू आहे. मी कायमच रुटच्या फलंदाजीचे कौतुक करतो. त्यात तो सध्या घरच्या मैदानावर खेळत असल्याने अधिक जोशमध्ये चांगली कामगिरी करत आहे.”
इतर बातम्या
IPL 2021 आणि टी-20 विश्वचषकात हार्दिक पंड्या गोलंदाजी करणार? भारतीय प्रशिक्षकाने दिली मोठी माहिती
(Indian captain Virat kohlis coach rajkumar sharma shocked on his downfall in ICC test ranking)