मुंबई : ICC World Cup 2023 स्पर्धा यंदा भारतात होणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान वर्ल्ड कप रंगणार आहे. मायदेशात होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये खेळताना टीम इंडिया एकूण 9,700 किमीचा प्रवास करणार आहे. टीम इंडिया एकूण नऊ शहरात वर्ल्ड कपचे सामने खेळणार आहे. यंदा वर्ल्ड कप स्पर्धा भारतात होत आहे. त्यामुळे सहाजिकच विजेतेपदासाठी टीम इंडिया फेव्हरेट आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचे महत्वाचे सामने ज्या टीम विरुद्ध होणार आहेत, तिथल्या खेळपट्टी बद्दल जाणून घेऊया.
टीम इंडियाच्या वर्ल्ड कप अभियानाला 8 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. पाचवेळच्या विश्वविजेत्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध सलामीचा सामना होईल. चेन्नईमध्ये ही मॅच होणार आहे. दोन्ही टीम्सनी आतापर्यंत परस्परांविरुद्ध बरेच सामने खेळले आहेत. त्यामुळे या मॅचमध्ये धावांचा पाऊस पाहायला मिळू शकतो.
टीम इंडियाचा पहिला सामना कुठे?
विजयाने सुरुवात करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. पण ऑस्ट्रेलिया तुल्यबळ संघ आहे. 1987 साली भारतात त्यांनी पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकला होता. वर्ल्ड कप 2023 आधी एमए चिंदबरम स्टेडियममध्ये बरेच बदल होणार आहेत. टीम इंडियाला या स्टेडियमवर अजूनपर्यंत एकदाही 300 धावांचा टप्पा गाठता आलेला नाही. त्यावरुन तुम्ही या पीचबद्दल अंदाज बांधू शकता.
चेन्नईच्या मैदानात टीम्सच पहिलं प्राधान्य बॅटिंगला असतं. कारण नंतर खेळपट्टी धीमी होत जाते. फिरकी गोलंदाजांना ही खेळपट्टी अनुकूल आहे. यावर्षाच्या सुरुवातीला तिसऱ्या आणि निर्णायक वनडेमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केलं होतं.
GET YOUR CALENDARS READY! ?️?
The ICC Men’s @cricketworldcup 2023 schedule is out now ⬇️#CWC23https://t.co/j62Erj3d2c
— ICC (@ICC) June 27, 2023
पाकिस्तान विरुद्ध सामन्यात विकेट कशी असेल?
वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान सामन्याची सर्वांना प्रतिक्षा असते. वनडे वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत सातवेळा भारताने पाकिस्तानला पराभूत केलं आहे. 15 ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर मॅच होईल. 1984 पासून भारतीय टीम इथे 10 वनडे मॅच खेळली आहे. त्यात 8 सामने जिंकले आहेत. हे मोठं मैदान आहे. इथे धावा बनवणं सोपं नाही. हा पीच हळूहळू धीमा होत जातो. सुरुवातीला गोलंदाजांना मदत मिळेत. पण नंतर विकेट फलंदाजांना अनुकूल होत जाते. या मैदानावर धावांचा पाऊस पाहायला मिळालेला नाही.
इंग्लंड विरुद्ध लखनऊमध्ये कोणाची सरशी होईल?
टीम इंडियाचा इंग्लंड विरुद्ध सामना लखनऊच्या इकाना स्टेडियमवर होईल. आयपीएल 2023 दरम्यान इकानाची विकेट स्लो होती. इथे मोठ्या धावसंख्येची अपेक्षा नाहीय. टीम इंडियाने इथे जास्त वनडे सामने खेळलेले नाहीत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना झालेला. पण पावसामुळे ही मॅच 40 ओव्हरची झाली. त्यात टीम इंडियाचा पराभव झाला होता. ही विकेट काळ्या मातीने बनवण्यात आली आहे. त्यामुळे इथे स्पिनर्सना मदत मिळेल. त्यामुळे चेंडू धीम्या गतीने बॅटवर येईल.