मेलबर्न: टीम इंडिया 2007 नंतर एकदाही टी 20 वर्ल्ड कप (T20 World Cup) जिंकू शकलेली नाही. यंदा टी 20 वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियामध्ये होत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारी टीम इंडिया (Team India) विजेतेपदाची प्रबळ दावेदार आहे. टीम इंडियाने वर्ल्ड कपसाठी सर्वोत्तम खेळाडूची निवड केली आहे. या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाची बेस्ट प्लेइंग 11 (Playing 11) काय असू शकते? त्यावर नजर टाकूया.
दाखल झाल्यानंतर ऑस्ट्रेलियात किती सामने जिंकले?
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात दाखल झाल्यानंतर वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विरुद्ध दोन सराव सामने खेळले आहेत. यात एका मॅचमध्ये विजय मिळाला, दुसऱ्या सामन्यात पराभव झाला. यानंतर पहिल्या वॉर्मअप मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवलं. दुसरा न्यूझीलंड विरुद्धचा वॉर्मअप सामना पावसामुळे रद्द झाला.
कोण कुठल्या क्रमांकावर खेळणार?
टीम इंडियाच्या फलंदाजीबद्दल बोलायच झाल्यास, कोण कुठल्या क्रमांकावर खेळणार हे ठरलेलं आहे. कॅप्टन रोहित शर्मा आणि केएल राहुल ओपनिंगला येतील. रोहितचा फॉर्म चिंतेचा विषय आहे. मुख्य स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर रोहित फॉर्ममध्ये येईल, अशी अपेक्षा आहे. केएल राहुल चांगल्या फॉर्ममध्ये आहे. विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर येईल. सूर्यकुमार यादव चौथ्या स्थानावर येईल.
पाचव्या नंबवर हार्दिक पंड्या आणि त्यानंतर दिनेश कार्तिक आहे. दोघेही फिनिशरच्या रोलमध्ये असतील. या दोघांवर बरच काही अवलंबून आहे.
स्पिन ऑलराऊंडर की फलंदाज
टीम इंडिया तीन वेगवान गोलंदाज आणि दोन स्पिर्न्सना घेऊन खेळणार, की दोन स्पिर्न्सच्या जागी एका फलंदाजाला संधी देणार?. पहिल्या कॉम्बिनेशनने गेल्यास टीम इंडियाकडे गोलंदाजीचे सहा पर्याय असतील. पण दुसऱ्या स्थितीत हे शक्य नसेल. दोन फिरकी गोलंदाजांना संधी द्यायची असेल, तर अक्षर पटेल किंवा अश्विन यापैकी एकाला संधी मिळेल. हे दोघेही उपयुक्त फलंदाजी करु शकतात.
टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग-11
रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह.