मुंबई: सध्या फक्त टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या फिटनेसबद्दल चर्चा सुरु आहे. बुमराह आगामी टी 20 वर्ल्ड कपमध्ये खेळणार नाहीय. टीम इंडियासाठी हा एक मोठा झटका आहे. त्यामुळे या बद्दल चर्चा होणं स्वाभाविक आहे. टीम इंडियाने मात्र या सर्व चर्चांना मागे सोडलय. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी टी 20 सीरीजवर त्यांनी सर्व लक्ष केंद्रीत केलय.
टीम इंडियात गुवाहाटीमध्ये दाखल
जसप्रीत बुमराहच्या जागी रिप्लेसमेंट म्हणून मोहम्मद सिराजचा टीममध्ये समावेश करण्यात आलाय. तीन टी 20 मॅचच्या सीरीजमधील दुसरा सामना खेळण्यासाठी टीम इंडिया गुरुवारी 29 सप्टेंबरला तिरुवनंतपुरमहून रवाना झाली. टीम इंडियात गुवाहाटीमध्ये दाखल झाली आहे.
एयरपोर्टवर फॅन्सची मोठी गर्दी
आसामच्या याच शहरात 2 ऑक्टोबरला सामना होणार आहे. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेत सीरीजमधला दुसरा सामना होणार आहे. गुवाहाटीमध्ये दाखल झाल्यानंतर टीम इंडियाच जोरदार स्वागत करण्यात आलं.
एयरपोर्टवर फॅन्सची मोठी गर्दी जमली होती. तिथल्या कलाकारांनी आसामच पारंपारिक नृत्य सादर केलं. रस्त्याच्या दुतर्फाही टीम इंडियाची एक झलक पाहण्यासाठी तोबा गर्दी झाली होती.
Thiruvananthapuram ✅
Hello Guwahati ?#TeamIndia | #INDvSA | @mastercardindia pic.twitter.com/QQU2cdVxF5
— BCCI (@BCCI) September 30, 2022
सिराज गुवाहाटीमध्ये टीमसोबत जॉइन झाला
तिरुवनंतपुरममध्ये टीम इंडियाने विजयी सुरुवात केली आहे. आता दुसऱ्या मॅचची तयारी सुरु आहे. या सामन्यात सगळ्यांच्या नजरा मोहम्मद सिराजवर असतील. त्याचा बुमराहच्या जागी समावेश करण्यात आलाय. सिराज गुवाहाटीमध्ये टीमसोबत जॉइन झालाय. शुक्रवारी 30 तारखेला टीमच्या पहिल्या सराव सत्रातही तो सहभागी झाला.