T20 world Cup 2021: शिखरच्या गैरहजेरीत रोहित बरोबर सलामीला कोण?, विराट नाही तर ‘या’ खेळाडूवर जबाबदारी

| Updated on: Sep 09, 2021 | 1:53 PM

श्रीलंका दौऱ्यामध्ये भारतीय संघाचा कर्णधार असणाऱ्या शिखर धवनला टी-20 विश्वचषकासाठीच्या संघात घेण्यात आलेले नाही. आय़पीएल 2021 च्या पहिल्या पर्वात सर्वाधिक धावा करणारा भारतीय शिखरच आहे.

T20 world Cup 2021: शिखरच्या गैरहजेरीत रोहित बरोबर सलामीला कोण?, विराट नाही तर या खेळाडूवर जबाबदारी
शिखर धवन
Follow us on

मुंबई : ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान यूएई आणि ओमानमध्ये होणाऱ्या आयसीसी टी-20 विश्वचषकासाठी (ICC T20 World Cup 2021)  भारतीय क्रिकेट संघाची (Indian Cricket Team) घोषणा नुकतीच करण्यात आली. 15 सदस्यांच्या या संघात अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. पण संघात एक सर्वात अनुभवी फलंदाजाला न घेतल्यामुळेही अनेक चर्चांना उधाण आलं आहे. हा फलंदाज म्हणजे भारतीय संघातील गब्बर अर्थात शिखर धवन (Shikhar Dhawan). डावखुरा हा सलामीवीर मागील एक दशकापासून भारतीय संघात खेळत आहे.  वनडे आणि टी-20 संघातील सलामीवीराची भूमिका पार पाडणाऱ्या शिखरच्या अनुपस्थितीत रोहितसोबत कोण उतरणार हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. सूर्यकुमारला तिसऱ्या स्थानावर पाठवण्यासाठी विराटला सलामीला उतरावे लागेल अशी चर्चा असतानाच ही जबाबदारी केएल राहुल (KL Rahul) पार पाडणार असल्याचं समोर येत आहे. तसंच राहुलला पर्याय म्हणून इशान किशनही (Ishan Kishan) संघात आहेच.

शिखर धवन की गैरहाजिरी से कई सवाल खड़े हो रहे हैं और उनमें सबसे अहम सवाल कप्तान विराट कोहली के इस साल मार्च में दिए गए बयान से खड़ा हो रहा है. इंग्लैंड के खिलाफ इस साल की शुरुआत में हुई घरेलू टी20 सीरीज से पहले कप्तान कोहली ने कहा था, कि आगे बढ़ने के साथ राहुल और रोहित ओपनिंग करेंगे, जबकि धवन तीसरे ओपनर की जिम्मेदारी निभाएंगे. इतना ही नहीं, सीरीज के आखिर तक कप्तान कोहली ने खुद भी ओपनिंग की थी और कहा था कि वह भी विश्व कप में ये जिम्मेदारी निभा सकते हैं. हालांकि, अब ये भी नहीं होने वाला.

धवनचं प्रदर्शन चढ-उतारांच

आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात धवनच्या प्रदर्शनात अलीकडे अनेक चढ उतार आले आहेत. डिसेंबर, 2020  पासून धवन 7 टी-20 सामने खेळला आहे. ज्यात एक अर्धशतक आणि दोन डावांत 40 हून अधिक धावा करु शकला आहे. यावेळी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अर्धशतकावेळी त्याचा स्ट्राइक रेट 144 होता. पण बाकी वेळी तो वेगवान धावा करु शकला नाही. पण आयपीएलच्या (IPL 2021) अलीकडच्या पर्वात मात्र शिखरने उत्तम कामगिरी केली आहे. सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज शिखरच आहे.

शिखर धवनच्या आयुष्यात वादळ, बीसीसीआयकडून झटका

दोन महिन्यांपूर्वी शिखर धवनच्या नेतृत्वाखालील टीमने श्रीलंका दौऱ्यात चांगली कामगिरी केली. पहिल्यांदाच कर्णधारपदाची संधी मिळालेल्या शिखरने टीम इंडियाला एकदिवसीय मालिकेत श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवून दिला. 3 सामन्यांच्या मालिकेत शिखरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने 2-1 अशी सरशी केली. तर टी ट्वेन्टी मालिकेत देखील भारतीय संघ लंकेला नडला. दोन महिन्यांपूर्वी कर्णधार असलेल्या प्रमुख खेळाडूला आज टी ट्वेन्टी संघातून वगळण्याचा बीसीसीआयचा निर्णय अनेकांच्या पचनी पडला नाहीय.

टी- 20 विश्वचषकासाठी भारतीय संघ – 

भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), के एल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, राहुल चहर, रविचंद्रन अश्विन, अक्सार पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी

राखीव: श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर आणि दिपक चहर

हे ही वाचा :

T20 world Cup 2021: विराट कोहलीचे 2 एक्के, तरीही टीम इंडियात स्थान नाहीच!

T20 world Cup 2021: भारतीय संघात 5 फिरकी गोलंदाज, इतके फिरकीपटू घेण्यामागे ‘हे’ आहे कारण

T 20 World Cup : टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा, अश्विनला संधी, शार्दूल ठाकूर रिजर्वमध्ये, धोनी मेंटरच्या भूमिकेत

(Indian cricket team squad for t20 world cup dropped shikhar dhawan so kl rahul or ishan kishan will open for india)