नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटमधील एक दिग्गज फिरकीपटू असणाऱ्या हरभजन सिंग (Harbhajan Singh) आणि त्याची पत्नी अभिनेत्री गीता बसरा (Geeta basra) यांच्या घरी एक नवा पाहुणा आला आहे. दोघेही दुसऱ्यांदा माता-पिता झाले असून त्यांनी नुकताच एका मुलाला जन्म दिला. याआधी दोघांना एक मुलगी आहे. हरभजनने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. हरभजनने पोस्टमध्ये मुलगा आणि बायको दोघेही सुखरुप असल्याची माहिती दिली असून कॅप्शनमध्ये देवाचे धन्यवादही मानले आहेत.
हरभजनने लिहिलं आहे, “आम्ही देवाला धन्यवाद करतो की आम्हाला एक स्वस्थ मुलाच्या रुपात आशीर्वाद दिले आहेत. गीता आणि मुलगा दोघेही सुखरुप आहेत. आम्ही दोघेही अत्यंत आनंदी असून सर्व शुभचिंतकाचे त्यांनी दिलेल्या प्रेमाबद्दल आणि आशीर्वादाबद्द आभार मानतो.” गीता आणि हरभजन यांचे 29 ऑक्टोबर 2015 रोजी लग्न झाले होते. 2016 मध्ये त्यांनी एका मुलीला जन्म दिला होता. तिचे नाव त्यांनी हिनाया असं ठेवलं होतं.
हरभजन सिंगच्या पोस्टवर अनेक चाहते शुभेच्छा देत असून लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत. सध्या श्रीलंका दौऱ्य़ावर भारतीय संघाचा कर्णधार असणाऱ्या शिखर धवन (Shikhar Dhawan) याने देखील हरभजनला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने लिहिलं आहे की,“पाजी बहुत मुबारकां.” शिखरसह अनेकांनी हरभजन आणि गीताला शुभेच्छा दिल्या आहेत.
हे ही वाचा :
(Indian Cricketer Harbhajan Singh and Geeta Basra Blessed with Baby Boy Become Parents Second Time)