ना नोरा ना आणखी कुणाचा तोरा, मनिष पांडेची पत्नी तेवढीच चर्चेत, साऊथ इंडियन सिनेमातही काम
आयपीएल 2021 मध्ये सनरायजर्स हैद्राबाद संघाने अतिशय खराब कामगिरी केली. पण संघाचा दिग्गज खेळाडू मनिष पांडेच्या पत्नीने मात्र सर्वांचच लक्ष वेधून घेतलं असून तिच्या लूक्सची चर्चा सर्वत्र आहे.
1 / 5
आयपीएल 2021 मध्ये सनरायजर्स हैद्राबाद संघाने खास कामगिरी केली नाही. संघाचा दिग्गज खेळाडू मनिषही आपली छाप सोडण्यात अयशस्वी ठरला. पण त्याची पत्नी आश्रिता शेट्टी (Ashrita Shetty) हिने मात्र सोशल मीडियावर धुमाकुळ घातला. हैद्राबादच्या सामन्यादरम्यान आश्रिता संघाचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी मैदानात येत होती. त्याचवेळी प्रेक्षकांनी तिला पाहिला आणि तिच्या सौंदऱ्याची चर्चा सर्वत्र होऊ लागली.
2 / 5
मनीष पांडे आणि आश्रिता शेट्टी हे दोघेही 2 डिसेंबर 2019 रोजी लग्नबंधनात अडकले होते.
3 / 5
आश्रिताही मनिषची पत्नी असण्यासोबतच मॉडेल आणि अभिनेत्री देखील आहे. तिने अनेक दाक्षिणात्य सिनेमांमध्ये काम केलं आहे.
4 / 5
आश्रिता शेट्टीने 2010 साली 'क्लीन एंड क्लीयर फ्रेश फेस ब्यूटी कॉन्टेस्ट' मध्ये सहभाग घेतला होता. त्यानंतर ती 'उदयम एनएच 4' (Udhayam NH4) या चित्रपटात झळकली होती.
5 / 5
आश्रिता झळकलेला 'उदयम एनएच 4' हा चित्रपट सुप्रसिद्ध दिग्दर्शक मणिमरण यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई देखील केली.