मुंबई : भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू स्टुअर्ट बिन्नीने (Stuart Binny) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने सोमवारी (30 ऑगस्ट) ही माहिती दिली. मागील बराच काळापासून भारतीय संघातून बाहेर असलेल्या बिन्नीने हा निर्णय घेतल्यानंतर अनेकांनी त्याला पुढील जीवनासाठी शुभेच्छ दिल्या आहेत. सोशल मीडियावरही त्याला अनेक क्रिकेटप्रेमी शुभेच्छा देत आहेत.
37 वर्षीय बिन्नी 2016 मध्ये अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. रणजीसारख्या स्थानिक स्पर्धांमध्ये दिसणारा बिन्नी पुन्हा भारतीय संघात येण्यासाठी प्रयत्न करत होता. पण अखेर संधी न मिळाल्याने टी-20 विश्वचषकाच्या तोंडावर बिन्नीने हा निर्णय घेतला आहे. बिन्नीने 2014 मध्ये न्यूझीलंड संघाविरुद्ध इंटरनेशनल क्रिकेटमध्ये डेब्यू केला होता. त्याने भारताकडून 6 कसोटी, 14 एकदिवसीय आणि 3 टी-20 सामने खेळले आहेत.
Well played #StuartBinny. Wish you well and hope you continue to have a fulfilling life within our game.
— Harsha Bhogle (@bhogleharsha) August 30, 2021
स्टुवर्ट य़ाने कारकिर्दीत काही खास कामगिरी केली नसली तरी त्याच्या नावावर एक रेकॉर्ड आजही आहे. जो कोणताच भारतीय तोडू शकला नाही. त्याने एकदिवसीय सामन्यात 2014 साली बांग्लादेशच्या विरुद्ध केवळ 4 धावा देत 6 विकेट पटकावले होते. त्याचा हा रेकॉर्ड आजही कायम आहे.
स्टुवर्टची कारकिर्द
बिन्नीने कसोटी क्रिकेटमध्ये 194 धावा आणि 3 विकेट घेतले आहेत. तसेच एकदिवसीय सामन्यांत 230 धावांसह 20 विकेट पटकावले आहेत. याशिवाय टी-20 सामन्यांत 35 धावा करत 1 विकेट घेतला आहे. तर 95 प्रथम श्रेमी सामन्यात बिन्नीने 4 हजार 796 धावा करत 148 विकेट घेतले आहेत.
हे ही वाचा :
तिसऱ्या कसोटीत पराभूत होणारी टीम इंडिया ‘युजलेस’; मायकल वॉनचा विराटसेनेवर वार