Rishabh Pant Accident: काय झालं? ऋषभ पंतची कार अचानक कशी पलटली?

| Updated on: Dec 30, 2022 | 12:32 PM

Rishabh Pant Accident: उत्तराखंडच्या रुडकी जवळ ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात झालाय. हा अपघात कसा घडला, ते जाणून घ्या....

Rishabh Pant Accident: काय झालं? ऋषभ पंतची कार अचानक कशी पलटली?
rishabh car accident
Follow us on

डेहराडून: टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंतसोबत शुक्रवारी सकाळी एक मोठी दुर्घटना घडली. ऋषभ पंतच्या कारला दिल्ली-डेहराडून हायवेवर रुडकी जवळ अपघात झाला. ऋषभची कार डिवायडरला धडकली. पंतची कार या धडकेनंतर पलटली. त्यानंतर कारला आग लागली. पंत कसाबसा कारच्या बाहेर पडला. त्यामुळे त्याचा जीव वाचला. ऋषभला या अपघातात गंभीर जखमा झाल्या आहेत. त्याच्या पायाला सुद्धा फ्रॅक्चर आहे. आता प्रश्न हा आहे की, पंतसोबत ही दुर्घटना कशी घडली? पंतची कार कशी पलटी झाली?

ऋषभ कुठे चाललेला?

ऋषभ पंत शुक्रवारी दिल्लीवरुन रुडकीला चालला होता. रुडकीला ऋषभच घर आहे. त्याची कार नारसन जवळ पोहोचताच डिवायडरच्या खांबाला धडकली. त्यानंतर कार पलटी झाली. रिपोर्ट्सनुसार ऋषभ पंत स्वत: कार ड्राइव्ह करत होता. त्यात त्याच्याकडून कुठेतरी चूक झाली.

पंतच्या डोळ्यावर झोप?

ऋषभ पंत एकटाच गाडी चालवत होता. त्याच्यासोबत कारमध्ये कोणी नव्हतं. ड्रायव्हिंग करताना पंतचा डोळा लागल्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचं स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटलं असावं. कार ज्या पद्धतीने खांबाला धडकली, त्यावरुन कारचा वेग 80 ते 100 किमी प्रतितास असण्याची शक्यता आहे. कार एवढ्या वेगात असतानाच पलटी होते. त्यात आग लागण्याची शक्यता असते. पंतसोबत सुद्धा असंच घडलं असावं. पंत स्वत: त्याची कार चालवत होता. ही एक मजबूत कार मानली जाते. ऋषभच्या कारचा जो अपघात झालाय, त्यात जीव वाचण्याची शक्यता कमी असते.
पंतला गंभीर दुखापत

ऋषभ पंतला सुरुवातीला स्थानिक लोकांनी हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं. त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागलाय. पायाला सुद्धा फ्रॅक्चर आहे. मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन पंतची विचारपूस केली. त्याला डेहराडूनच्या रुग्णालयात रेफर केलय. पंतला या अपघातातून बर होण्यासाठी 3 ते 4 महिने लागू शकतात.