Rishabh Pant Accident: ऋषभ पंतच्या अपघातच CCTV फुटेज आलं समोर, पहा अंगावर काटा आणणारा VIDEO

| Updated on: Dec 30, 2022 | 11:22 AM

Rishabh Pant Accident: पहाटेच्या सुमारास ऋषभ पंतच्या गाडीचा दिल्ली-डेहराडून हायवेवर कसा भीषण अपघात झाला, त्याचं फुटेज समोर आलय.

Rishabh Pant Accident: ऋषभ पंतच्या अपघातच CCTV फुटेज आलं समोर, पहा अंगावर काटा आणणारा VIDEO
rishabh pant car accident
Follow us on

डेहराडून: टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंतच्या कारला शुक्रवारी सकाळी भीषण अपघात झाला. ऋषभ पंत या अपघातात गंभीर जखमी झालाय. पण सुदैवाने त्याचे प्राण वाचले. ऋषभच्या कारला दिल्ली-डेहराडून हायवेवर रुडकी जवळ अपघात झाला. ऋषभ पंत शुक्रवारी दिल्लीवरुन रुडकीला चालला होता. रुडकीला ऋषभच घर आहे. त्याची कार नारसन जवळ पोहोचताच डिवायडरच्या खांबाला धडकली. त्यानंतर कार पलटी झाली. पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला.

कार कोण ड्राइव्ह करत होतं?

रिपोर्ट्सनुसार ऋषभ पंत स्वत: कार ड्राइव्ह करत होता. त्यात त्याच्याकडून कुठेतरी चूक झाली असावी.
दरम्यान आता ऋषभ पंतच्या अपघाताच सीसीटीव्ही फुटेज समोर आलय. अपघाताच्यावेळी ऋषभची कार किती वेगात होती, ते या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतय. हा व्हिडिओ पाहतान अंगावर काटा येतो.


अपघातानंतर काय घडलं?

ऋषभची कार डिवायडरला धडकली. पंतची कार या धडकेनंतर पलटली. त्यानंतर कारला आग लागली. पंत कसाबसा कारच्या बाहेर पडला. त्यामुळे त्याचा जीव वाचला. ऋषभला या अपघातात गंभीर जखमा झाल्या आहेत. त्याच्या पायाला सुद्धा फ्रॅक्चर आहे.

पंतला हॉस्पिटलमध्ये कोणी नेलं?

ऋषभ पंतला सुरुवातीला स्थानिक लोकांनी हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं. त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागलाय. पायाला सुद्धा फ्रॅक्चर आहे. मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन पंतची विचारपूस केली. त्याला डेहराडूनच्या रुग्णालयात रेफर केलय. पंतला या अपघातातून बर होण्यासाठी 3 ते 4 महिने लागू शकतात.