Rishabh Pant Car Accident: टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंतच्या गाडीला शुक्रवारी सकाळी भीषण अपघात झाला. दिल्लीवरुन रुडकीला जाताना त्याची कार डिव्हायडरला धडकून पलटी झाली. त्यानंतर कारला आग लागली. सुदैवाने या अपघातातून ऋषभचे प्राण वाचले. पण ऋषभ पंत गंभीर जखमी झाला आहे. ऋषभची कार रुडकीच्या गुरुकुल नारसन क्षेत्रात डिवायडरला धडकली. जखमी ऋषभ पंत विंडो स्क्रीन तोडून बाहेर पडला.
ऋषभ स्वत:च्या पायावर उभा राहिला
अपघातानंतरचे ऋषभ पंतचे व्हिडिओ सोशल मीडियावर आता व्हायरल झाले आहेत. अपघातानंतर ऋषभ स्वत:च्या पायावर उभा राहिला. दिल्ली-डेहराडून हायवेवर हा अपघात झाला. या मार्गावरुन जाणाऱ्या लोकांनी मदत केली. त्यांनी ऋषभच्या शरीराभोवती चादर गुंडाळल्याच दिसतय. ऋषभ रक्तबंबाळ अवस्थेत उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर रक्ताचे डाग होते. हरियाणा रोडवेजच्या सुशील कुमार नावाच्या एका ड्रायव्हरने सर्वप्रमथ ऋषभला मदत केली.
त्या ड्रायव्हरने काय सांगितलं?
“मी पाहिलं ऋषभ पंत जमिनीवर पडलेला होता. कारमधून आगीचा स्पार्क येत होता. आम्ही त्याला उचलून बाजूला नेलं. कारच्या आत अजून कोणी आहे का? म्हणून विचारलं. मी एकटाच आहे, ऋषभ पंत असल्याच त्याने सांगितलं. मला क्रिकेटबद्दल इतकी माहिती नाही. मी त्याच्या बाजूला उभा राहिलो. शरीरावर कपडे नव्हते. आम्ही त्याच्या अंगावर चादर लपेटली. पोलिसांना फोन केला. रुग्णवाहिका आल्यानंतर हॉस्पिटलमध्ये पाठवलं” अशी माहिती बस ड्रायव्हर सुशीलने दिली.
एक्सीडेंट के तुरंत बाद अपने पैरों पर खड़े दिखे ऋषभ पंत। सर से खून निकल रहा था। महादेव ने मौत के मुंह से बचा लिया। भगवान जल्द स्वस्थ करें।#Rishabpant @RishabhPant17 pic.twitter.com/fFbpWAbfDb
— Shubham shukla (@ShubhamShuklaMP) December 30, 2022
MRI स्कॅन झालं
ऋषभ पंतला डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलय. पंतसोबत त्याची आई रुग्णालयात आहे. पंतच्या डोक्याला आणि गुडघ्याला मार लागलाय. त्याच MRI स्कॅन करण्यात आलं. पायाला आणि पाठिला सुद्धा मार लागलाय.