मुंबई : पहिला टी-20 विश्वचषक (T 20 World Cup 2007) त्यात भारताचा अंतिम सामन्यात पाकिस्तानवर (Pakistan) रोमहर्षक विजय. ज्यानंतर देशभरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
महेंद्र सिंग धोनीच्या (MS Dhoni) कर्णधारपदाखाली पहिला मोठा विजय मिळवलेली ही स्पर्धा सर्व भारतीयांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि यादगार आहे. पण भारताचा महान अष्टपैलू युवराज सिंगने (Yuvraj Singh) याच स्पर्धेबाबत एक खंत व्यक्त केलीये. ‘या स्पर्धेत मला कर्णधारपद मिळेल असं वाटत होतं. पण मला न देता धोनीला कर्णधारपद देण्यात आलं.’ अशी खंत युवराजने व्यक्त केली आहे. (Indian Cricketer Yuvraj Singh says Mahendra Singh Dhoni Comes between Me And My Captainship)
युवराज सिंगने 22 यार्न्स या पॉडकास्टमध्ये या गोष्टीचा खुलासा केला. म्हणजे स्पर्धेच्या तब्बल 14 वर्षानंतर युवराजने ही खंत बोलून दाखवली. तो म्हणाला, ”मला या स्पर्धेत भारतीय संघाचा कर्णधार होण्याचं स्वप्न होतं. पण धोनीला कर्णधारपद दिल्यामुळे माझ्या कर्णधारपदाच्या स्वप्नाच्या आड धोनी आला”
22 यार्न्स या पॉडकास्टमध्ये बोलताना युवी म्हणाला, “T20 विश्वचषकादरम्यान सर्व दिग्गज खेळाडू विश्रांतीवर होते. सर्व तरुण खेळाडूंना संधी दिली होती. त्यामुळे मला कर्णधार केलं जाईल अशी मला आशा होती. पण अचानक एमएस धोनीच्या नावाची घोषणा करण्यात आली.”
युवराजसाठी एमएस धोनी कर्णधार होणार हा निर्णय धक्कादायक होता. पण तरीदेखील धोनी आणि त्याच्या नात्यात कडूपणा आला नाही. युवराजने खेळाडू वृत्तीने संपूर्ण स्पर्धेत उत्तम कामगिरी कर धोनीला सपोर्ट केला. धोनी आणि युवराज यांनी मिळून कितीतरी महत्त्वाचे सामने भारताला जिंकवून दिले.
हे ही वाचा :
WTC Final : भारतीय संघ मोठ्या पेचात, महत्वाच्या खेळाडूला बाहेर बसवण्याची शक्यता
(Indian Cricketer Yuvraj Singh says Mahendra Singh Dhoni Comes between Me And My Captainship)