ICC ODI Team of The Year 2021 मध्ये भारतीयांना स्थान नाही, मात्र पाकिस्तान-बांगलादेशचा दबदबा

| Updated on: Jan 20, 2022 | 1:15 PM

ICC ने 2021 सालासाठी सर्वोत्तम ODI खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. ICC ODI Team of The Year 2021 मध्ये कोणताही भारतीय खेळाडू स्थान मिळवू शकलेला नाही. पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर आझम याला या संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे.

ICC ODI Team of The Year 2021 मध्ये भारतीयांना स्थान नाही, मात्र पाकिस्तान-बांगलादेशचा दबदबा
Indian ODI Team
Follow us on

मुंबई : ICC ने 2021 सालासाठी सर्वोत्तम ODI खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. ICC ODI Team of The Year 2021 मध्ये कोणताही भारतीय खेळाडू स्थान मिळवू शकलेला नाही. पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर आझम याला या संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. या संघात तीन बांगलादेशी, दोन पाकिस्तानी आणि दोन श्रीलंकन खेळाडूंना स्थान मिळालं आहे. त्यामुळे ICC ODI Team of The Year 2021 मध्ये पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंकेच्या खेळाडूंचा दबदबा पाहायला मिळत आहे.

ICC ने गुरूवारी (20 जानेवारी) गेल्या वर्षभरात एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली. एक दिवस अगोदर म्हणजे काल (बुधवारी) आयसीसीने पुरुषांच्या T20 संघाचीही घोषणा केली होती आणि त्यातही एकाही भारतीय खेळाडूला स्थान मिळाले नाही. या एकदिवसीय संघात बांगलादेशचे सर्वाधिक 3 खेळाडू आहेत, तर पाकिस्तान, श्रीलंका, आयर्लंड आणि दक्षिण आफ्रिकेच्या प्रत्येकी दोन खेळाडूंना स्थान मिळाले आहे.

भारताशिवाय सध्याचा विश्वविजेता इंग्लंड, टी-20 चॅम्पियन ऑस्ट्रेलिया, टेस्ट चॅम्पियन न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिजच्या एकाही खेळाडूला आयसीसीच्या वनडे संघात स्थान मिळालेले नाही. टी-20 संघाचा कर्णधार बनलेला पाकिस्तानी दिग्गज खेळाडू बाबर आझम याच्याकडेच एकदिवसीय संघाचीही कमान सोपवण्यात आली आहे. बाबरने भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीची जागा घेत गेल्या वर्षी एकदिवसीय क्रमवारीत पहिले स्थान मिळवले होते.

पाहा आयसीसीचा एकदिवसीय संघ

ICC ODI Team of The Year 2021

श्रीलंकेचे दोन खेळाडू

बाबर व्यतिरिक्त या संघात पाकिस्तानी क्रिकेटपटू फकर जमान याचादेखील समावेश करण्यात आला आहे. तर श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू वानिंदू हसरंगा आणि गोलंदाज दुष्मंथा चमीरा आयसीसीच्या एकदिवसीय संघात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरले आहेत.

इतर बातम्या

Shardul Thakur: बॉलिंगमध्ये फ्लॉप पण बॅटिंगमध्ये हिट, लॉर्ड शार्दुलच ऑलराऊंडर हार्दिक पांड्याची जागा घेणार?

U19 World Cup: भारताचा आयर्लंडवर मोठा विजय, 12 चेंडूत 48 धावा तडकावणारा हरनूर ठरला हिरो

IND vs SA 1st ODI: ‘या’ तीन चुकांमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा पराभव

(Indian cricketers have no place in ICC ODI Team of the Year 2021, Pakistan-Bangladesh made dominance)