Marathi News Sports Cricket news Indian Opener Shubman Gill injured so Who WIll open For India At India vs England Test series Mayank Agarwal KL Rahul Abhimanyu Easwaran and Hanuma Vihari are options
IND vs ENG Test Series : शुभमन गिलला दुखापत, रोहित सोबत सलामीसाठी कोण उतरणार?, ‘हे’ आहेत प्रमुख दावेदार
भारताचा कसोटी सामन्यांमध्ये रोहित शर्मा सोबत सलामीला उतरणारा शुभमन गिल दुखापत ग्रस्त झाला आहे. त्यामुळे 4 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताला नव्या सलामीवीराची गरज भासणार आहे.
1 / 5
भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंडमध्ये आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) अंतिम सामन्यात पराभवानंतर आता भारत इंग्लंड विरोधात 5 सामन्यांची
कसोटी मालिका खेळणार आहे. मात्र या सामन्यांआधी भारताचा सलामीवीर शुभमन गिल (Shubhman Gill) दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे जर सामन्यांपूर्वी तो फिट झाला नाही
तर भारतीय संघाला नवा सलामीवीर खेळवावा लागेल.
2 / 5
तर शुभमन जागी सलामीसाठी सर्वात पहिला पर्याय म्हणजे मयांक अगरवाल (Mayank Agarwal). कारण याआधी इंग्लंड दौऱ्यावर मयांक
इंग्लंड विरोधात सलामीला उतरला असून त्याने इंग्लंडच्या मैदानावर चांगली खेळी केली होती. त्याने भारतीय संघाकडून 14 टेस्टमध्ये 45.73 च्या सरासरीने
1 हजार 52 धावा केल्या आहेत. ज्यात तीन शतकांसह चार अर्धशतकांचा समावेश आहे.
3 / 5
गिलच्या जागेसाठी दुसरा प्रबळ दावेदार आहे भारताचा स्टार क्रिकेटर के एल राहुल (KL Rahul). राहुलने याआधी मुरली विजयसह मिळून भारतासाठी
काही कसोटी सामन्यांत अप्रतिम कामगिरी केली आहे. एका यष्टीरक्षकाची भूमिकाही राहुल निभावू शकत असल्याने त्यालाही या जागेचा प्रबळ दावेदार मानलं जात आहे.
राहुलने भारतीय संघासाठी 34.58 च्या सरासरीने 36 टेस्टमध्ये 2 हजार 6 धावा केल्या आहेत. ज्यात 5 शतकांसह 11 अर्धशतकांचा समावेश आहे.
4 / 5
लोकेश आणि मयांक यांच्याशिवाय आणखी एक फलंदाज सलामीसाठी उतरु शकतो. तो म्हणजे ऑस्ट्रेलिया दौऱ्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणारा हनुमा विहारी (Hanuma Vihari)
हनुमा याआधी भारताकडून सलामीसाठी उतरला असून त्याने एका संयमी खेळीचे दर्शन केले आहे. त्यामुळे गिलच्या जागी सलामीसाठी विहारीची वर्णी देखील लागू शकते.
5 / 5
या सर्व अनुभवी खेळाडूंसह भारतीय संघाकडे आणखी एक खेळाडू सलामीवीर म्हणून भूमिका पार पाडू शकतो. तो म्हणजे
भारतीय संघासोबत स्टँड बाय खेळाडू म्हणून गेलेला अभिमन्यू ईश्वरन (Abhimanyu Easwaran). 25 वर्षीय अभिमन्यूने
64 प्रथम श्रेणी सामन्यांत 4 हजार 402 धावा केल्या आहेत. 43.57 च्या सरासरीने केलेल्या या धावांमध्ये 13 शतकांसह 18 अर्धशतकांचा समावेश आहे.