क्रिकेटचा भारतीय चाहत्यांवर मोठा प्रभाव आहे. क्रिकेटपटूंइतकंच त्यांच्या पत्नीनाही स्टारडम मिळतं.
क्रिकेटपटूंच्या पत्नीही बऱ्याचदा मैदानात दिसतात. एमएस धोनीची पत्नी सुद्धा क्रिकेट चाहत्यांसाठी स्टारपेक्षा कमी नाही.
आयपीएल स्पर्धेच्यावेळी बऱ्याचदा साक्षी धोनी चेन्नई सुपर किंग्ससाठी चियर करताना दिसते. साक्षी धोनी आपल्या स्टारडमबद्दल मोकळेपणाने बोलली आहे. तिने चेन्नई सुपर किंग्सच्या युट्यूब चॅनलवर आपलं म्हणणं मांडलं.
"धोनीने आपल्या मेहनतीने शिखर गाठलं. कोट्यवधी लोकांमधून त्याची निवड झाली. भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या खेळाचा तो भाग आहे, याचा अभिमान वाटतो" असं साक्षी धोनीने सांगितलं.
"सर्वसामान्य आयुष्य जगताना लग्न झाल्यानंतर तुमचं आयुष्य बदलतं. नवरा ऑफिसला जातो. पण इथे आमचा नवरा बाहेर क्रिकेट खेळायला जातो. त्या हिशोबाने आम्हाला स्वत:च्या आयुष्यात बदल करायचा असतो. त्यावेळी तुमच्यामुळे पतीला टेन्शन येणार नाही, याची काळजी घ्यायची असते" असं साक्षी धोनीने सांगितलं.
"कॅमेऱ्यासमोर असताना तुमच्याकडे तुमचा पर्सनल स्पेस नसतो" असं साक्षीने सांगितलं.
काही लोक कॅमेऱ्यासमोर सहजतेने वावरु शकतात. काहींना ते जमत नाही, असं साक्षीने सांगितलं.
"तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत असाल, पण तुम्ही एखाद्या क्रिकेटरची पत्नी आहात, तर लोकही लगेच तुमच्याबद्दल मत बनवतात" असं साक्षी धोनीने सांगितलं.
आयपीएलच्यावेळी चेन्नई सुपर किंग्सला सपोर्ट करताना धोनीसोबत त्याची मुलगी जीवा सुद्धा दिसते. उत्तराखंडमध्ये चार जुलै 2010 रोजी धोनी साक्षीसोबत विवाहबद्ध झाला.
धोनी आणि साक्षीचा संसार सुखाने सुरु आहे. धोनीला आयुष्यात साक्षीने महत्त्वाच्या प्रसंगात नेहमीच साथ दिली आहे. सोशल मीडियावर या जोडीचे मोठ्या संख्येने फॉलोअर्स आहेत.