लंडन : भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाने (Ravindra Jadeja) इंग्लंड संघाविरुद्ध (England Cricket Team) ओव्हल कसोटीत गोलंदाजीत कमाल केली. चार महत्त्वाच्या फलंदाजाना तंबूत धाडणाऱ्या जाडेजाने फलंदाजीत खास कामगिरी केली नसली तरी एक नवा रेकॉर्ड त्याने इंग्लंडविरुद्ध प्रस्थापित केला आहे.
रवींद्र जाडेजा इंग्लंड संघाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये 50 विकेट्स आणि 500 धावा पूर्ण करणारा चौथा भारतीय अष्टपैलू खेळाडू ठरला आहे. जाडेजाने चौथ्या कसोटीत हासीब हमीद आणि मोईन अली हे दोन महत्त्वाचे विकेट्स घेत, इंग्लडविरुद्ध 51 विकेट्स पूर्ण केले. तसंच दोन्ही डावांत त्याने 27 धावा केल्या असल्या तरी याआधीच त्याने 500 धावांचा टप्पा पूर्ण केल्याने एकूण 672 धावा पूर्ण केल्या आहेत.
जाडेजाच्या आधी ही कामगिरी 3 भारतीय अष्टपैलू खेळाडूंनी केली आहे. यामध्ये कपिल देव, वीनू मकंड आणि रवीचंद्रन आश्विन यांची नावं आहेत. कपिल यांनी इंग्लंडविरुद्ध 85 विकेट्स गेत 1 हजार 355 धावा केल्या आहेत. तर वीनू यांनी 54 विकेट्स घेत 618 धावा केल्या आहेत. आश्विनने आतापर्यंत 88 विकेट्स घेत 970 धावा केल्या आहेत.
ओव्हलच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडचा 157 धावांनी धुव्वा उडवला. या विजयाने 50 वर्षांनंतर ओव्हलच्या किल्ल्यावर भारताने तिरंगा फडकावला. भारताने 5 कसोटींच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. म्हणजेच आता इंग्लंड दौऱ्यावर गेलेली विराटसेना कसोटी मालिका गमावून माघारी फिरणार नाही, एकतर साहेबांना आस्मान दाखवून परत येईल नाहीतर हम भी किसीसे कम नहीं म्हणत मालिकेत बरोबर करेल…..!
इतर बातम्या
Special Report : इंग्लंड दौऱ्यातही मोठी खेळी नाहीच, अजिंक्य रहाणेचं करिअर संपलं का?
(Indian Ravindra Jadeja did rare record against england became 4th Indian all rounder to do this)