नॉटिंघम : भारत आणि इंग्लंड यांच्या 4 ऑगस्ट पासून पाच सामन्यांची टेस्ट सिरीज खेळवली जाणार आहे. या सामन्यांपूर्वी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने दिनेश कार्तिक (Dinesh Kartik) जो सध्या इंग्लंडमध्ये कॉमेन्ट्री करत आहे. त्याला दिलेल्या एका मुलाखतीत अनेक खेळासह खाजगी जीवनातील गोष्टींबाबत चर्चा केली
‘स्काय स्पोर्ट्स’ वर विराटने दिनेश कार्तिकला मुलाखत दिली. यावेळी मालिकेबद्दल बोलताना विराट म्हणाला, ”पाच सामन्यांच्या टेस्ट मालिकेतील प्रत्येक डावात अथक परिश्रम करुन विजय कसा मिळवता येईल याकडे लक्ष देणं आमच्यासाठी गरजेचं असेल. त्यासाठी सामन्याआधीच तगड्या सरावावरही आम्ही लक्ष देत आहोत.”
मुलाखतीदरम्यान कोहलीने त्याचे वडिल, मुलगी आणि पत्नी अनुष्काबाबतही बातचीत केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या दो वर्षांआधी डिसेंबर, 2006 विराटचे वडिल प्रेम कोहली यांच निधन झालं. त्यानंतर टीम इंडियात पदार्पण करत कोहलीने 2008 मध्ये अंडर -19 वर्ल्ड कप जिंकला. पण त्याचे वडिल त्याच हे यश पाहू शकले नाहीत. दरम्यान मुलाखतीत विराटला वडिलांच्या नसण्याबाबत विचारले असता तो म्हणाला, “त्यांनी मला भारतासाठी खेळताना नाही पाहिलं. आता मला माझी मुलगी, आई यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो त्यावेळी मी बसून विचार करतो की वडिल असले तर त्यांनी काय झालं असतं.” कार्तिकने या मुलाखतीचा टीझर त्याच्या ट्विटरला शेअर केला आहे.
Aaaaaah you gotta love @imVkohli‘s passion for test cricket .
Best in the business ?? https://t.co/Z2lSYebreO
— DK (@DineshKarthik) August 2, 2021
हे ही वाचा
IND vs ENG : भारताविरुद्ध मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, चार दिग्गज खेळाडूंचे पुनरागमन
(Indian Skipper Virat Kohli became Emotional in memories of his late father)