साऊदम्पटन : भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC Final) अंतिम सामन्यासाठी आपली रणनीती आखण्यात व्यस्त आहे. मात्र संघाला एक मोठी चिंता सतावत आहे. सध्या संघाकडे अंतिम 11 मध्ये खेळवण्यासाठी 4 खमके वेगवान गोलंदाज आहेत. मात्र दोन फिरकीपटू खेळवायचे असल्यास चौघांपैकी एका वेगवान गोलंदाजाला बसवावे लागणार आहे. त्यात सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोहम्मद सिराजला (Mohammad Siraj) अंतिम सामन्यात खेळवण्यासाठी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) उत्सुक असल्याचे समोर आले आहे. ज्यामुळे इतर वेगवान गोलंदाजामधील एका खेळाडूला विश्रांती द्यावी लागू शकते. (Indian Team in Tension To Choose Playing 11 For WTC Final Thinking To take Mohammad Siraj instead Of Shami or Ishant Sharma)
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC Final) म्हणजे कसोटी क्रिकेटचा वर्ल्ड कपच असल्याने हा सामना भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. भारतीय संघ विजयासाठी जीवाचे रान करणार असून संघनिवड यावेळी अत्यंत महत्त्वाची असेल. भारताने ऑस्ट्रेलियाविरोधात कसोटी सामन्यांत उत्तम प्रदर्शन केल्यामुळे भारतीय संघाकडे कसोटीमध्ये खेळण्यासाठी बरेच चांगले खेळाडू आहेत. त्यामुळे अंतिम 11 मध्ये कोणाला संधी द्यायची याची चर्चा सध्या सुरु आहे. त्यात सर्वात अवघड निर्णय हा वेगवान गोलंदाजाबाबतचा असणार आहे.
सध्या भारताकडे दिग्गज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah), मोहम्मद शमी (Mohmmad Shami), इशांत शर्मासह (Ishant Sharma) नवख्या मोहम्मद सिराजचा पर्याय आहे. सिराज जरी नवखा असला तरी ऑस्ट्रेलिया विरोधात त्याने एका डावात 5 विकेट घेत केलेल्या अप्रतिम प्रदर्शनामुळे त्याच नाव अंतिम 11 मध्ये घेतलं जात आहे. कर्णधार विराट देखील सिराजला खेळवण्यासाठी उत्सुक असल्याचं सूत्रांकडून समोर आले आहे. मात्र फिरकीपटूहूी सामन्यात महत्त्वाचे असल्याने किमान दोन फिरकीपटूंची गरज आहे. त्यामुळे जास्तीत जास्त तीन वेगवान गोलंदाज भारतीय संघात असू शकतात. त्यामुळे सिराजला घेतल्यास बुमराह, शमी किंवा शर्मापैकी एकाला बसवावे लागेल. बुमराह सर्वात महत्त्वाचा गोलंदाज असल्याने तो अंतिम 11 मध्ये असणे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे शमी आणि शर्मा यांच्यातील एकाला विश्रांती दिली जाऊ शकते.
भारत मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये न्यूझीलंडशी भिडला होता. त्यावेळी न्यूझीलंडच्या दौऱ्यातील दोन्ही कसोटी सामने भारत पराभूत झाला होता. वेलिंग्टनच्या पहिल्या टेस्टमध्ये 10 विकेट्सने आणि ख्राइस्टचर्च येथील दुसऱ्या टेस्टमध्ये 7 विकेट्सने भारताला पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे अंतिम सामन्यात भारतीय संघाला चांगल्या खेळाचे प्रदर्शन करुन विजय मिळवावा लागेल.
इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघात सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये असणाऱ्याच खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) या संपूर्ण टीमचे नेतृत्त्व करणार असून कोहलीसह अजिंक्य रहाणे(उपकर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव हेही या दौऱ्यात असणार आहेत.
हे ही वाचा :
या अंपायरने अंपायरींग केली की टीम इंडिया मॅच हरतेच, WTC फायनलसाठी ICC कडून ‘या’ अंपायरची घोषणा!
WTC Final : ‘हे’ दोन खेळाडू करु शकतात कमाल, माजी भारतीय क्रिकेटपटूची भविष्यवाणी
(Indian Team in Tension To Choose Playing 11 For WTC Final Thinking To take Mohammad Siraj instead Of Shami or Ishant Sharma)