मुंबई : भारतीय संघाने मंगळवारी श्रीलंकेला (India vs Sri Lanka) जबरदस्त पराभवाचा धक्का दिला. भारताचा पराभव नक्की असताना अष्टपैलू खेळाडू दीपक चहरने (Deepak Chahar) श्रीलंकेच्या मुखातला विजयाचा घास हिरावून घेतला. या सामन्यासह भारताने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेऊन मालिकाही खिशात घातली. श्रीलंकेला नमविल्यानंतर भारतीय संघ भलताच खूश आहे. प्रशिक्षक राहुल द्रविडला (Rahul Dravid) देखील आनंद झालाय. हाच आनंद द्विगुणित करण्यासाठी राहुल द्रविड भारतीय संघातील काही खेळाडूंसमवेत डिनरला पोहोचला.
भारतीय संघाचा कर्णधार शिखर धवनने (Shikhar Dhawan) त्याच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड, कर्णधार शिखर धवन, भुवनेश्वर कुमार तसंच त्याची पत्नी नुपूर दिसत आहेत. हा फोटो कुठल्याशा हॉटेलमधील असून डिनरसाठी हे सर्वजण गेल्याचं दिसून येत आहे.
अतिशय रोमांचक सामन्यात दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने श्रीलंकेला 3 विकेट्सने हरवलं. दीपक चहर आणि भुवनेश्वर कुमारने आठव्या विकेटसाठी नाबाद 84 धावांची भागीदारी करत श्रीलंकेच्या स्पप्नांना सुरुंग लावला. पहिल्या फळीतील महत्त्वाचे सगळे शिलेदार तंबूत परतलेले असताना दीपक चहरने भुवीला साथीला घेऊन टीम इंडियाच्या विजयाची नौका पार करुन दाखवली.
तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने लंकेला 2-0 असं नमवलं आहे. आता उर्वरित शेवटचा सामना शुक्रवारी (23 जुलै) रोजी होत आहे. या सामन्यात भारतापासून लंकेला व्हॉईटवॉशचा धोका आहे. कारण भारतीय संघातले सगळेच खेळाडू सध्या तुफान फॉर्मात आहेत. तसंच मालिका विजयानंतर भारतीय संघातल्या खेळाडूंचा आत्मविश्वास सातव्या मंजिलवर आहे.
indian team player Dinner With Coach Rahul Dravid After India Won One Day Series Against Sri lanka
हे ही वाचा :
IND vs ENG : भारताचा नवखा गोलंदाज, 74 धावा देत 7 विकेट, 24 वर्षांनंतर लॉर्ड्सवर विजय
IND vs SL : भारताकडून पराभवानंतर दिग्गज श्रीलंकन क्रिकेटपटू मुरलीथरन नाराज, म्हणाला…
IND vs ENG : भारताविरुद्ध मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, चार दिग्गज खेळाडूंचे पुनरागमन