लंडन : मागील महिन्यातच भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंडचा दौरा केला. भारतीय महिलांनी सामन्यासह मर्यादीत षटकांच्या सामन्यातही चांगली कामगिरी केली. त्यानंतर आता भारताच्या काही युवा महिला क्रिकेटपटू इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या द हंड्रेड स्पर्धेत (The Hundred Tournament) धमाल कामगिरी करत आहेत. यात आधी भारताची युवा फलंदाज जेमिमा रोड्रिग्स (Jemimah Rodrigues) हिने उत्तम कामगिरी केल्यानंतर आता स्फोटक सलामीवीर शेफाली वर्माने (Shefali Verma) देखील तुफान खेळी केली आहे.
सोमवारी झालेल्या सामन्यात शेफालीने जबरदस्त कामगिरी करत तिच्या बर्मिंगहॅम फिनिक्स संघाला विजय मिळवून दिला. सामन्यात वेल्श फायर संघाने 100 चेंडूत 9 विकेट्सच्या बदल्यात 127 धावा केल्या. ज्यामुळे शेफालीच्या बर्मिंगहॅम संघाला 128 धावांचे लक्ष्य मिळाले. त्यानंतर फलंदाजी दरम्यान शेफालीने 22 चेंडूत अर्धशतक पूर्ण करत 76 धावांची खेळी केली. तिने या डावात 42 चेंडूंत 9 चौकार आणि 2 षटकार ठोकले. तिने एव्हलिन जोन्ससोबत 131 धावा करत संघाला 10 विकेट्सनी दमदार विजय मिळवून दिला. तिच्या खेळीसाठी तिला सलामीवीर म्हणूनही गौरवण्यात आलं.
Shafali Verma returned to form with an incredible 76* off just 42 balls at Edgbaston ?
There’s a reason this teenager is rated so highly ?#TheHundred match report ⬇️https://t.co/VidKW5qmpi pic.twitter.com/6I38wjPjBJ
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) August 10, 2021
शेफालीप्रमाणे भारताची दुसरी युवा फलंदाज जेमिमा रोड्रिग्सही दमदार खेळी करत आहे. तिने स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात नाबाद 92 धावा ठोकल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात नॉर्दर्न सुपरचार्जर्सकडून खेळताना तिने ट्रेंट रॉकेट्ससंघाविरुद्ध 41 चेडूंत 60 धावा केल्या यावेळी पहिल्या 40 धावा तर तिने अवघ्या 10 चेंडूत केल्या होत्या. तिच्या या खेळीमुळे नॉर्दर्न सुपरचार्जर्सने ट्रेंट रॉकेट्सवर 27 धावांनी विजयही मिळवला होता.
इतर बातम्या
The Hundred मध्ये ‘या’ भारतीय महिला खेळाडूचा कहर सुरुच, 10 चेंडूत ठोकल्या 40 धावा, चौकारांचा पाऊस
(Indian Women Batter Shefali verma stunning innings at the hundred)