मुंबई : भारतीय पुरुष संघाप्रमाणे महिला संघही सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. एकमेव कसोटी सामना ड्रॉ झाल्यानंतर एकदिवसीय मालिकेतही इंग्लंडच्या संघाने जिंकली. मात्र अखेरच्या सामन्यात भारताने अप्रतिम विजय मिळवत 3 पैकी 1 सामना मात्र आपल्या नावे केला. भारतासाठी हा विजय खास ठरला कारण या सामन्यातच भारताच्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी जागतिक विक्रम केला. एकीकडे कर्णधार मिताली राजने सामन्यात केलेल्या 75 धावांमुळे (Mithali Raj) आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये 10 हजार 337 धावांचा टप्पा पार केला आणि सर्वाधिक धावा करणारी महिला खेळाडू ठरली. तर दुसरीकडे दिग्गज गोलंदाज झुलन गोस्वामीने (Jhulan Goswami) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2000 हून अधिक ओव्हर्स टाकत विश्वविक्रम केला आहे. (Indian Women Fast Bowler Jhulan Goswami Became First Ever Woman to Bowl 2000 Overs in International Cricket)
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने पहिली गोलंदाजी घेतली. यावेळी भारतीय महिलांनी इंग्लंडला 219 धावांत ऑलआऊट केले. ज्यात झुलनने 9 ओव्हर टाकत एक विकेटही पटकावला आणि या ९ ओव्हर्ससह तिने एकदिवसीय सामन्यात 1500 ओव्हर्सचा टप्पा पार केला. यासोबतच टेस्ट सामन्यांत झुलनने 349 आणि टी-20 सामन्यांत 225 ओव्हर्स टाकत एकूण 2000 ओव्हर्सचा टप्पा पार केल आहे. अशी कामगिरी कऱणारी ती एकमेव महिला गोलंदाज आहे.
महिला क्रिकेटमधील सर्वांत महान गोलंदाज झुलन गोस्वामीने अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 19 वर्ष पूर्ण केलेल्या झुलन गोस्वामीने महिला क्रिकेटमध्ये 300 पेक्षा अधिक विकेट मिळवणारी जगातील एक मात्र गोलंदाज आहे. झुलनने आपल्या इंटरनॅशनल क्रिकेट करियर मध्ये 333 विकेट घेतल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 200 पेक्षा जास्त विकेट घेणारी झुलन जगातील एकमेव गोलंदाज आहे. तिने 180 एकदिवसीय क्रिकेट मॅचेसमध्ये 236 विकेट घेतल्या आहेत तर 11 कसोटी सामन्यात तिने 41 महिला फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला आहे. 68 टी ट्वेंटी सामन्यात 56 विकेट तिच्या नावावर आहेत.
झुलन गोस्वामी भारतीय महिला क्रिकेटसह जागतिक क्रिकेट जगतातील एक मोठं नाव आहे. त्यामुळे तिच्या आयुष्यावर एक सिनेमा येतोय. विशेष म्हणजे झुलनच्या बायोपिकमध्ये अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) प्रमुख भूमिका साकारणार आहे. सध्या विराटबरोबर इंग्लंडमध्ये लेक वामिकासोबत असणारी अनुष्का गेल्या काही महिन्यांपासून चित्रपटापासून दूर आहे. शाहरुख खानबरोबर ‘जीरो’ चित्रपटानंतर ती मोठ्या पडद्यावर दिसली नाही. आता लवकरच प्रेक्षकांची ओढ संपणार आहे. झुलनच्या बायोपिकमध्ये अनुष्का शर्मा प्रमुख भूमिका साकारणार आहे.
हे ही वाचा :
झुलन गोस्वामीच्या बायोपिकमध्ये अनुष्का शर्मा साकारणार प्रमुख भूमिका, निळ्या जर्सीमधला फोटो व्हायरल
(Indian Women Fast Bowler Jhulan Goswami Became First Ever Woman to Bowl 2000 Overs in International Cricket)