लंडन : भारतीय महिला क्रिकेटपटू सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहेत. एकमेव टेस्ट अनिर्णीत राहिल्यानंतर नुकतील एकदिवसीय मालिका ही संपली पहिले दोन सामने जिंकलेल्या इंग्लंडने मालिका आधीच आपल्या खिशात घातली होती. मात्र अखेरच्या सामन्यात कर्णधार मिताली राज (Mithali Raj) आणि स्मृती मंधानाच्या (Smriti Mandhana) उत्कृष्ठ खेळीवर भारताने विजय मिळवला. स्मृतीने फलंदाजीत योगदाना बरोबरच क्षेत्ररक्षणातही दमदार कामगिरी केली. तिने बाऊन्ड्री लाईनवर पकडलेल्या एका अप्रतिम कॅचचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. (Indian Women vs England Women Third one day Won By India in match Smriti Mandhana Garbs Stunning Diving Catch Video Went Viral)
इंग्लंडचा संघ प्रथम फलंदाजी करत असताना फलंदाज सिवर चांगल्या लयीत खेळताना दिसत होती. दरम्यान दीप्ति शर्मा 38 वी ओव्हर टाकत असताना 49 धावांवर खेळणाऱ्या सिवरने पुढे येऊन एक शॉट खेचला. चेंडू हवे उडाला आणि मिडविकेटच्या दिशेने गेला. त्याचवेळी स्मृतिने एक अप्रतिम झेप घेत सिवरने मारलेला चेंडू पकडला आणि सिवरला तंबूत धाडले. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे.
WHAT A CATCH ?
Smriti Mandhana ??#ENGvIND pic.twitter.com/xjrNSByrJ6— Akash (@im_akash196) July 3, 2021
भारत आणि इंग्लंड यांच्यातील अखेरचा एकदिवसीय सामना सुरुवातीपासून भारताच्या पारड्यात होता. आधी भारतीय गोलंदाजानी उत्तम कामगिरी करत इंग्लंडला 219 धावांत ऑलआऊट केले. त्यानंतर भारताकडून सलामीला आलेल्या स्मृतीने कर्णधार मितालीसोबत उत्तम भागिदारी केली. अवघ्या एका धावेने स्मृती अर्धशतकापासून दूर राहिली. स्मृती बाद झाल्यानंतरही मितालीने टिकून राहत नाबाद 75 धावांच्या जोरावर भारताला विजय मिळवून दिला.
हे ही वाचा :
स्मृती मंधानाला लग्नासाठी कसा मुलगा हवा?, चाहत्याच्या प्रश्नावर स्मृतीचं Cute उत्तर
मिताली राजचा अनोखा रेकॉर्ड, कोहली-रोहित शर्मासह अनेक दिग्गजांना टाकलं मागे, इंग्लंडमध्ये रचला इतिहास
(Indian Women vs England Women Third one day Won By India in match Smriti Mandhana Garbs Stunning Diving Catch Video Went Viral)