Womens T20I Tri-Series final : टीम इंडियाने बुधवारी हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड विरुद्ध टी 20 सीरीज 2-1 अशी जिंकली. त्याचवेळी महिला क्रिकेट टीम वेस्ट इंडिजला हरवून तिरंगी मालिकेच्या फायनलमध्ये पोहोचली. महिला टीम इंडिया फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला भिडणार आहे. भारतीय महिला क्रिकेट टीमच्या मोठ्या विजयानंतर ड्रेसिंग रुममध्ये सेलिब्रेशन ठरलेलं असतं. आताही डान्सचा असाच एक व्हिडिओ समोर आलाय. फायनल खेळण्याआधी टीम इंडियाच्या महिला ब्रिगेडने ड्रेसिंग रुममध्ये जोरदार सेलिब्रेशन केलं. महिला क्रिकेट टीमचा डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये महिला टीम इंडियाच्या खेळाडू डान्स करताना दिसतायत.
स्मृती मांधना आणि हरमनप्रीत टॉप थ्रीमध्ये
हा व्हिडिओ महिला टीमची सदस्य राजेश्वरी गायकवाडने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय. या व्हिडिओत उपकर्णधार स्मृती मांधना, स्नेह राणा, पूनम यादव आणि जेमिमा रॉड्रिग्स डान्स करताना दिसतायत. या सीरीजमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये स्मृती मांधना आणि हरमनप्रीत टॉप थ्रीमध्ये आहेत. फायनलमध्ये या दोन्ही खेळाडूंकडून स्पेशल परफॉर्मन्सची अपेक्षा आहे.
टीम इंडिया: हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृति मंधाना (उपकर्णधार), अंजलि सरवनी, यास्तिका भाटिया, हरलीन देओल, राजेश्वरी गायकवाड़, अमनजोत कौर, एस मेघना, मेघना सिंह, शिखा पांडे, स्नेह राणा, रेणुका सिंह, जेमिमा रोड्रिग्स, दीप्ति शर्मा, देविका वैद्य, पूजा वस्त्राकर, सुषमा वर्मा आणि राधा यादव
दक्षिण अफ्रीका: सुने लुस (कॅप्टन), क्लो ट्रायन (उपकर्णधार), एनेके बॉश, तजमीन ब्रिट्स, नादिने डि क्लर्क, एनेरी डर्कसेन, लारा गुडाल, शबनीम इस्माइल, शिनालो जाफ्टा, मरिजाने काप, अयाबोंगा खाका, मसाबाटा क्लास, टेबोगो माचेके, नोनकुलुलेको म्लाबा, तुमी शेखुखुने, डेल्मी टकर, लौरा वोल्वार्ट.