Birthday Special : तरुण-तडफदार युवा फलंदाज, भारतीय क्रिकेटचं भविष्य, विश्वचषक जिंकवून देणाऱ्या खेळाडूचा आज वाढदिवस
भारतीय क्रिकेट संघात सध्या अनेक युवा खेळाडू आहेत. भारताचे क्रिकेट भविष्य उज्वल असणार यात काही शंका नाही. यातीलच एका खेळाडूचा आज (8 सप्टेंबर) वाढदिवस आहे.
1 / 5
भारतीय संघातील (Indian Cricket Team) युवा फलंदाज आणि भारतीय क्रिकेटचं भविष्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शुभमन गिलचा (Shubhman Gill) वाढदिवस आहे. आज आपला 22 वा वाढदिवस साजरा करणाऱ्या शुभमनचा जन्म 8 सप्टेंबर, 1999 मध्ये पंजाबच्या फाजिल्का येथे झाला होता. पण क्रिकेट बनण्यासाठी त्याच्या वडिलांनी फाजिल्कामधून मोहालीला येण्याचं ठरवलं आणि तिथेच राहून शुभमन क्रिकेटचा सराव करु लागला.
2 / 5
शुभमनचे वडिल लखविंदर गिल यांनाही क्रिकेटर व्हायचं होतं. पण ते होऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलाला क्रिकेटर बनवण्यासाठी फार मेहनत घेतली. त्यानंतर 2018 मध्ये पृथ्वी शॉच्या नेतृत्त्वाखाली अंडर-19 विश्वचषक भारताने जिंकला. या स्पर्धेत अप्रतिम फलंदाजी करत शुभमनने मालिकावीराचा पुरस्कार मिळवत वडिलांच स्वप्न पूर्ण केल आणि भारताला एक नवा तरुण तडफदार फलंदाज मिळाला.
3 / 5
या कामगिरीनंतर गिलची क्रिकेट कारकिर्दीने एक नवं उड्डाण घेतलं. आय़पीएलमधील (IPL) अनेक संघ शुभमनला घेण्यासाठी उत्सुक होते. अखेर कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) या संधीचा फायदा घेत शुभमनला संघात घेतले. शुभमनने आयपीएल गाजवल्यानंतर 31 जानेवारी, 2019 रोजी न्यूझीलंड विरुिद्ध हॅमिल्टनमध्ये शुभमनचं भारतीय एकदिवसीय संघात पदार्पण झालं.
4 / 5
एकदिवसीय सामन्यात खास कामगिरी करु न शकणाऱ्या शुभमनने कसोटीमध्ये मात्र अप्रतिम कामगिरी केली. 2020-21 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय कसोटी संघात पादर्पण करत शुभमनने उत्तम कामगिरी केली. त्याने दुसऱ्याच सामन्यातील पहिल्या डावात अर्धशतक झळकावलं. तसंच ब्रिस्बेनच्या निर्णायक सामन्यात सलामीला येत 91 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. ज्यामुळे भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवू शकला.
5 / 5
गिलची कसोटी कामगिरी पाहत त्याला इंग्लंड दौऱ्यातही निवडण्यात आलं. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातही शुभमन संघात होता. त्यानंतर मात्र दुखापतीमुळे तो दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतला आहे. पण गिलची आतापर्यंतची कामगिरी पाहता तो भारतीय संघासाठी बराच काळ खेळेल यात शंका नाही.