कोलंबो : भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यात तिन एकदिवसीय सामन्यांच्या सिरीजला सुरुवात झाली आहे. पहिला सामना आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात भारताकडून सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि इशान किशन (Ishan Kishan) या दोघांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. भारताकडे विकेटकीपर म्हणून इशानसह संजू सॅमसनचा (Sanju Samson) पर्याय असताना संजूला संधी देण्यात आली नाही. यामागील नेमकं कारण आता समोर आलं आहे.
बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार संजूला पहिल्या एकदिवसीय सामन्यात न खेळवल्याचतं कारण तो दुखापतग्रस्त आहे, हे असून त्यासा गुडघ्यात लिगामेंटचा त्रास असल्याचेही समोर आले आहे. या कारणामुळेच संजूचं एकदिवसीय क्रिकेमधील पदार्पण हुकलं आहे. सध्या भारतीय संघाची मेडिकल टीम संजूची काळजी घेत आहे.
संजूजर दुखापतग्रस्त नसता तर पहिल्या एकदिवसीय सामन्यात इशानच्या जागी त्यालाच खेळवलं गेलं असतं. दोघेही विकेटकिपर असल्याने एकालाच संधी मिळाली असती. त्यात संजू आणि इशान या दोघांच्या तुलनेत संजू अनुभवी असल्याने आणि बराच काळ प्रथम श्रेणी क्रिकेट गाजवल्यामुळे त्यालाच संघात स्थान मिळालं असतं. संजूने आतापर्यंत भारतीय संघाच्या टी20 फॉर्मेटमध्ये पदार्पण केलं आहे.
संबंधित बातम्या
India vs Sri Lanka Live Score, 1st ODI : कुलदीप यादवची जादू, एकाच ओव्हरमध्ये दोन महत्त्वाचे विकेट्स
India vs Sri Lanka, 1st ODI live streaming: भारत विरुद्ध श्रीलंका, सामना कधी, कुठे आणि कसा पाहणार?
(Indian Young Wicket Keeper Sanju Samson didnt make debut in India vs Sri Lanka Match Due to Injury)