नवी दिल्ली : ओव्हलच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडचा 157 धावांनी धुव्वा उडवला आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह(Jasprit Bumrah)ने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत विक्रमाला गवसणी घातली आहे. या कसोटीत त्याने आपले 100 विकेट पूर्ण केले. ऑली पोप त्याचा 100 वा कसोटी बळी ठरला. 24 व्या कसोटीत जसप्रीत बुमराहने ही आश्चर्यकारक कामगिरी केली. 100 कसोटी विकेट घेणारा तो भारताचा सर्वात वेगवान गोलंदाज आहे. त्याने 25 कसोटीत 100 विकेट घेणाऱ्या कपिल देवला मागे टाकले आहे. तसे, एकंदरीत सर्वात जलद 100 कसोटी घेणारा तो आठवा भारतीय आहे. रविचंद्रन अश्विन आघाडीवर आहे, ज्याने 18 कसोटीत 100 विकेट घेतले. (India’s fast bowler Jaspreet Gumrah completed 100 wickets in the match against India)
भारतासाठी सर्वात वेगवान 100 विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये स्पिनर्स अव्वल सात ठिकाणी आहेत. अश्विन पाठोपाठ इरापल्ली प्रसन्ना (20 कसोटी), अनिल कुंबळे (21 कसोटी), भागवत चंद्रशेखर (22 कसोटी), सुभाष गुप्ते (22 कसोटी), प्रज्ञान ओझा (22 कसोटी), विणू मंकड (23 कसोटी) आणि रवींद्र जडेजा (24 कसोटी) कसोटी) यांची नावे बुमराहच्या आधी आहेत. जसप्रीत बुमराहने 2018 मध्ये कसोटीमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून त्याने आश्चर्यकारक प्रगती केली आहे. आता तो कसोटीत भारताचा नंबर वन वेगवान गोलंदाज बनला आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये हॅटट्रिकही घेतली आहे.
परदेशात 100 पैकी 96 विकेट्स घेतल्या
गंमतीची गोष्ट म्हणजे बुमराहने इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, न्यूझिलंड आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये त्याच्या 100 पैकी 96 कसोटी विकेट्स घेतल्या आहेत. या अंतर्गत ऑस्ट्रेलियात 32, इंग्लंडमध्ये 32, दक्षिण आफ्रिकेत 14, वेस्ट इंडिजमध्ये 13 आणि न्यूझिलंडमध्ये सहा विकेट्सचा समावेश आहे. भारतात खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यांमध्ये त्याच्या नावावर चार विकेट्स आहेत. 27 वर्षीय बुमराहने जानेवारी 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी पदार्पण केले. मग त्याने पहिली विकेट फक्त बोल्डद्वारे घेतली. त्याने एबी डिव्हिलियर्सला बोल्ड केले होते. आता शंभरावा विकेटही बोल्डद्वारेत घेतला. यावेळी ऑली पोप बोल्ड झाला. बुमराह सध्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत भारतासाठी सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. त्याने चार कसोटीत 18 विकेट्स घेतल्या आहेत. ऑली रॉबिन्सन नंतर तो मालिकेत सर्वाधिक विकेट घेणारा दुसरा खेळाडू आहे. रॉबिन्सनच्या खात्यात 21 विकेट्स आहेत.
भारताची इंग्लंडवर 2-1 अशी आघाडी
या सामन्यात सर्वप्रथम इंग्लंडचा कर्णधार जो रुटने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. इंग्लंडच्या गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत भारताचा पहिला डाव अवघ्या 191 धावांवर संपवला. त्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात 290 धावांपर्यंत मजल मारत 99 धावांची आघाडी मिळवली होती. ही आघाडी फोडत भारताने दुसऱ्या डावात 466 धावांचा डोंगर उभा केला आणि इंग्लंडला 368 धावांचं आव्हान दिलं. भारताने दिलेलं हे आव्हान इंग्लंडच्या फलंदाजांना पेलवलं नाही. इंग्लंडचा संघ 210 धावांमध्ये गारद झाला. त्यामुळे भारताने या सामन्यात इंग्लंडवर 157 धावांनी मात करत मालिकेत 2-1 अशी आघाडी मिळवली आहे. (India’s fast bowler Jaspreet Gumrah completed 100 wickets in the match against India)
1️⃣0️⃣0️⃣ Test wickets for Bumrah! ?
He shatters the stumps and gets there in true Bumrah style!Tune into Sony Six (ENG), Sony Ten 3 (HIN), Sony Ten 4 (TAM, TEL) & SonyLIV (https://t.co/AwcwLCPFGm ) now! ?#ENGvINDOnlyOnSonyTen #BackOurBoys #Bumrah #Pope pic.twitter.com/8CMDvdrevy
— Sony Sports (@SonySportsIndia) September 6, 2021
इतर बातम्या