मुंबई : भारतीय क्रिकेट संघाला मुंबईने अनेक हिरे दिले. यात सुनिल गावस्करांपासून तेंडुलकर ते आता रोहित शर्मा अशा अनेकांचा समावेश आहे. असेच एक दिग्गज क्रिकेटपटू आणि नंतर दिग्गज प्रशिक्षक असणारे वासु परांजपे (Vasoo Paranjape) आज सोमवार, 30 ऑगस्ट रोजी हे जग सोडून निघून गेले आहेत. ते 82 वर्षांचे होते. वासु परांजपे यांचा जन्म 21 नोव्हेंबर, 1938 रोजी गुजरातमध्ये झाला होता. 1956 ते 1970 दरम्यान मुंबई आणि वडोदरा संघासाठी 29 प्रथम श्रेणी सामने खेळणाऱ्या वासु यांनी 23.78 च्या सरासरीने 785 धावा केल्या होत्या. तर नऊ विकेटही मिळवल्या होत्या. त्यांच्या काळात ते मुंबईत दादर यूनियन संघासाठी खेळत. त्यावेळी त्यांचा संघ सर्वात ताकदवर संघ मानला जात. त्यांचा मुलगा जतिन परांजपे हा देखील भारतासाठी खेळला असून नॅशनल सिलेक्टरही राहिला आहे.
वासु यांनी भारतीय संघातून निवृत्ती घेतल्यानंतर प्रशिक्षक म्हणून काम करत अनेक क्रिकेटपटूंचं भविष्य घडवलं. यामध्ये सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, राहुल द्रविड आणि रोहित शर्मा सारखी नावं सामिल आहेत. अनेक संघाचे प्रशिक्षक म्हणून वासु यांनी काम पाहिलं असून ते राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रशिक्षकही राहिले आहेत. त्यांच्या निधनानंतर रवी शास्त्री, विनोद कांबळीस, अनिल कुंबळे यांच्यासह अनेकांनी शोक व्यक्त करत ट्विट केलं आहे.
Really saddened at the demise of Vasoo Paranjape. He was an institution in the game with a real positive vibe in whatever he did. Condolences to @jats72 and the family. God bless his soul ?? pic.twitter.com/LlIkaB242Q
— Ravi Shastri (@RaviShastriOfc) August 30, 2021
Saddened to hear the passing of Vasu Paranjape. Two years of my formative years at the National camp was a great learning under his tutelage. He will be missed. My condolences to @jats72 and family. ??
— Anil Kumble (@anilkumble1074) August 30, 2021
सुनील गावस्कर यांना सर्वजण सनी या निकनेमने बोलावतात. हे नाव वासु परांजपे यांनीच दिलं होतं. वासु परांजपे क्रिकेटसोबत बाकी गोष्टीतही हुशार होते. त्यांनी अनेक क्रिकेटपटूंना खाजगी जीवनातही मदत केली आहे. संदीप पाटील यांच्या विवाहावेळी मुलीकडचे मान्य होत नव्हते. त्यावेळी वासु यांनी मध्यस्थी करुन हे लग्न घडवून आणलं होतं.
हे ही वाचा
Tokyo Paralympics मध्ये भारताला मोठा झटका, विनोद कुमारला कांस्य पदक परत करण्याची वेळ
(Indias Former Cricketer and coach vasoo paranjape passes away at mumbai)