मुंबई: T20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला. तेव्हापासूनच टीम इंडियात बदल होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. सर्वातआधी निवड समितीला किंमत चुकवावी लागली. निवड समिती अध्यक्षांना पदावरुन हटवलं. आता टी 20 टीमच्या नेतृत्वात बदल करण्यात येणार आहे. सध्या रोहित शर्मा टी 20, वनडे आणि टेस्ट टीमचा कॅप्टन आहे. पण रोहितला लवकरच एका फॉर्मेटमध्ये नेतृत्व सोडावं लागेल.
रोहित शर्माला दिली कल्पना
हार्दिक पंड्या टी 20 फॉर्मेटमध्ये टीम इंडियाचा नवीन कॅप्टन असणार आहे. बीसीसीआयमधील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी बोर्डाच्या भूमिकेची रोहित शर्माला कल्पना दिली आहे. हार्दिक पंड्याला पूर्णवेळ टी 20 टीमच कॅप्टन बनवण्यात येणार आहे.
रोहितला काही आक्षेप आहे ?
टी 20 फॉर्मेटमध्ये कॅप्टनशिप बदलाबाबत बीसीसीआयमधील वरिष्ठ सदस्यांनी रोहित शर्मा बरोबर चर्चा केलीय. बीसीसीआयमधील सूत्रांच्या हवाल्याने इनसाइड स्पोर्ट्ने हे वृत्त दिलय. रोहितला सुद्धा बोर्डाच्या या निर्णयावर कुठलाही आक्षेप नाहीय. त्याला सुद्धा हे मान्य आहे. रोहित आता वनडे आणि टेस्ट टीमच्या कॅप्टनशिपवर लक्ष केंद्रीत करेल, असं सूत्रांनी सांगितलं.
कधी होणार निर्णय?
नव्या निवड समितीच्या नियुक्तीनंतर हार्दिकची टी 20 टीमच्या कॅप्टनशिपपदी कायमस्वरुपी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा करण्यात येईल. हार्दिकच्या नेतृत्वाखाली कालच टीम इंडियाने न्यूझीलंडमध्ये टी 20 सीरीज जिंकली. त्याआधी आयर्लंडमध्ये मालिका विजय मिळवला. हार्दिकने पहिल्याच प्रयत्नात गुजरात टायटन्सला आयपीएलच विजेतेपद मिळवून दिलं. त्याने आपल्यातील नेतृत्व गुण सिद्ध केलेत.