मुंबई : जागतिक क्रिकेटमध्ये म्हैसूर एक्सप्रेस अशा नावाने प्रसिद्ध हा खेळाडू कपिल देवनंतर भारताच्या वेगवान गोलंदाजीचा म्होरक्या बनला. कर्नाटकच्या मैदानातून खेळायला सुरुवात केलेल्या या खेळाडूने जगातील अनेक मैदानं गाजवली. भारतासाठी अनेक महत्त्वाचे विजय मिळवून देणाऱ्या या खेळाडूचे नाव आहे जवागल श्रीनाथ (Javagal Srinath). आज म्हणजेच 31 ऑगस्ट रोजी त्याचा 52 वा वाढदिवस असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बऱ्याच वर्षापूर्वी निवृत्ती घेतलेला जवागल आजही त्याच्या वेगवान गोलंदाजीसाठी स्मरणात आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जवागल श्रीनाथने 1991 मध्ये पदार्पण केले. त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये त्याने पाकिस्तानविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळला. पहिलाच सामना पाकिस्तानसोबत असल्याने श्रीनाथवर दबाव तर असणारच. पण सामन्यात श्रीनाथने पाकिस्तानच्या फलंदाजांना एक-एक धाव घेणंही अवघड केलं होतं. या सामन्यात श्रीनाथने 9 ओव्हरमध्ये केवळ 31 धावा देत 1 विकेटही घेतला. त्याच्या या भेदक गोलंदाजीमुळे भारत 60 धावांनी जिंकला होता. पुढील 12 वर्ष श्रीनाथने आंतरराष्ट्रीय क्रिकेट चांगलच गाजवलं.
Happy birthday to India’s joint highest wicket-taker in @cricketworldcup history, Javagal Srinath ? pic.twitter.com/va1EGrG8ZK
— ICC (@ICC) August 31, 2021
एकदिवसीय क्रिकेटमध्ये डेब्यू केल्यानंतर उत्कृष्ट कामगिरीमुळे केवळ दोन महिन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी संघात श्रीनाथला खेळण्याची संधी मिळाली. त्याने आपल्या कारकिर्दीत अप्रतिम गोलंदाजी करत अनेक रेकॉर्ड स्थापन केले. 1996 ते 97 मध्ये अहमदाबादमध्ये खेळण्यात आलेल्या दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याने केवळ 21 धावा देत 6 विकेट घेतल्या होत्या. तर 1998 ते 99 मध्ये पाकिस्तान विरुद्ध कोलकाता कसोटी सामन्यात एका डावात 8 विकेट घेत सामन्यात 13 विकेट मिळवल्या होत्या.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताकडून अनिल कुंबळेच्या 337 विकेट्सनंतर श्रीनाथचा 315 विकेटसह दुसरा नंबर लागतो. वनडेमध्ये 300 हून अधिक विकेट घेणारा तो एकमेव भारतीय वेगवान गोलंदाज आहे. शारजाहच्या मैदानावर सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट्स श्रीनाथच्या नावावर असून त्याची संख्या 39 आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही श्रीनाथ 500 हून अधिक विकेट घेणारा जगातील 11 वा गोलंदाज आहे.
हे ही वाचा
IND vs ENG : चौथ्या कसोटी सामन्यात सूर्यकुमारला जागा नाही, माजी क्रिकेटपटूने सांगितले कारण
(Indias one of the greatest pacer javagal srinath born on this day)