मुंबई : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अंतिम 15 खेळाडूंची नाव जाहीर केली आहे. विराट कोहलीकडे (Virat Kohli) कर्णधार पदाची धुरा सोपवत काही नवख्या खेळाडूंनाही संघात संधी देण्यात आली आहे. तसेच बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी या संघाचा मेन्टॉर असणार आहे. बीसीसीआयच्या बैठकीत ही घोषणा झाली आहे. या बैठकीला बीसीसीआय अधिकाऱ्यांसह विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री व्हिडीओ कॉन्फरन्सीगद्वारे जोडले गेले होते.
Former India Captain MS Dhoni (in file photo) to mentor the team for the T20 World Cup: BCCI Honorary Secretary Jay Shah pic.twitter.com/l7PChmS7yA
— ANI (@ANI) September 8, 2021
टी- 20 विश्वचषकासाठी भारतीय संघ –
भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), के एल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, राहुल चहर, रविचंद्रन अश्विन, अक्सार पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी
राखीव: श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर आणि दिपक चहर
TEAM – Virat Kohli (Capt), Rohit Sharma (vc), KL Rahul, Suryakumar Yadav, Rishabh Pant (wk), Ishan Kishan (wk), Hardik Pandya, Ravindra Jadeja, Rahul Chahar, Ravichandran Ashwin, Axar Patel, Varun Chakravarthy, Jasprit Bumrah, Bhuvneshwar Kumar, Mohd Shami.#TeamIndia
— BCCI (@BCCI) September 8, 2021
The Squad is Out! ?
What do you make of #TeamIndia for ICC Men’s T20 World Cup❓ pic.twitter.com/1ySvJsvbLw
— BCCI (@BCCI) September 8, 2021
भारत आणि पाकिस्तान या दोघांसह ग्रुप-2 मध्ये न्यूझीलंड आणि अफगानिस्तान हे संघही आहेत. तसेच ग्रुप स्टेजमधून पात्र होणारे दोन संघही याच ग्रुपमध्ये येणार असून या सर्वांच्या सामन्याला 24 ऑक्टोबरपासून सुरुवात होईल. दरम्यान भारताचे ग्रुपमधील सामने पुढीलप्रमाणे-
आधी भारतात पार पडणारा टी-20 विश्वचषक कोरोनाच्या संकटामुळे आता युएई आणि ओमान देशांत खेळवला जाणार आहे. काही दिवासांपूर्वीच बीसीसीआय़ आणि आयसीसी यांनी संयुक्त बैठकीतून हा निर्णय घेतला होता. दरम्यान युएई आणि ओमानमध्ये पार पडणाऱ्या या स्पर्धेचे सामने दुबई इंटरनॅशनल स्टेडियम, शेख जायद स्टेडियम (अबु धाबी), शारजाह स्टेडियम आणि ओमान क्रिकेट अॅकेडमी मैदान याठिकाणी खेळवले जाणार आहेत.
हे ही वाचा –
(Indias Playing 11 For T 20 world cup Announced By BCCI)