भारताची सर्वात दिग्गज महिला क्रिकेटपटू मिताली राजने (Mithali Raj) आज (26 जून) आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची 22 वर्षे पूर्ण केली आहेत. इतक्या दिर्घकाळ खेळणारा दुसरा भारतीय खेळाडू म्हणजे महान फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar). सचिन 22 वर्षे 91 दिवस आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला असून मितालीने आज 22 वर्षे पूर्ण केली आहेत.(Inidan Women Cricketer Mithali Raj Became First Female Indian to complete 22 Years in international Cricket)
मितालीने आजच्याच दिवशी म्हणजे 26 जून, 1999 रोजी आयर्लंड विरोधात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून आतापर्यंत तिने भारतीय महिला क्रिकेट संघाकडूनअप्रतिम कामगिरी केली आहे.
मितालीने काही महिन्यांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा टप्पा ओलांडला होता. तिने 75 अर्धशतकांसह 8 शतकही ठोकली आहेत.
मितालीने 22 वर्षे पूर्ण केली असून ती अजूनही भारताकडून खेळत आहे. तर दुसरीकडे सचिनने 22 वर्षे 91 दिवस खेळल्यानंतर 2012 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. सचिनने 18 डिसेंबर 1989 रोजी पाकिस्तान विरुद्ध पहिली वनडे खेळली होती. त्यानंतर 18 मार्च, 2012 रोजी पाकिस्तान विरोधातच शेवटची वनडे देखील खेळली.