बंगळुरु : RCB चं प्लेऑफच स्वप्न शुभमन गिलमुळे पूर्ण होऊ शकलं नाही. चिन्नास्वामी स्टेडियमवर त्याने शानदार शतक ठोकलं. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या स्वप्नांचा चुराडा झाला. RCB चा हा पराभव फक्त टीमच्याच नाही, तर त्यांच्या चाहत्यांच्या जबरदस्त जिव्हारी लागला. काहींनी शुभमन गिलबद्दल वाईट चिंतन केलं. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने गुजरात टायटन्सला विजयासाठी 198 धावांच मोठ टार्गेट दिलं होतं. गुजरातने शुभमनच्या फलंदाजीच्या बळावर हे अवघड लक्ष्य सहज गाठलं.
आरसीबीच्या काही फॅन्सना, तर आपण काय बोलतोय. हे सुद्धा समजत नव्हतं. ऋषभ पंतच्या जागी शुभमन गिल त्या कारमध्ये का नव्हता? असं काही फॅन्सनी म्हटलं.
सुदैवाने वाचला
30 डिसेंबर 2022 रोजी ऋषभ पंतच्या कारचा भीषण अपघात झाला. भारताचा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत त्या कारमध्ये होता. तो दिल्लीहून आपल्या घरी डेहराडूनला चालला होता. हा खूपच भीषण अपघात होता. फक्त सुदैवाने ऋषभ पंत या भीषण अपघातातून वाचला. दुखापत इतकी गंभीर आहे की, ऋषभ अजून त्यातून सावरलेला नाहीय.
त्या टि्वटने लक्ष वेधून घेतलं
IPL 2023 मधून आव्हान संपुष्टात आल्याने रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या फॅन्सना मोठा झटका बसलाय. सोशल मीडियावरही RCB च्या फॅन्सनी आपलं दु:ख व्यक्त केलं. एका फॅनच्या टि्वटने लक्ष वेधून घेतलं. शुभमन गिल बद्दलचा राग त्याच्या मनात दिसला.
असं टि्वट कसं केलं?
ऋषभ पंतचा अपघात झाला, त्या कारमध्ये शुभमन गिल का नव्हता? असं त्या टि्वटमध्ये लिहिलं होतं. पंतच्या जागी शुभमनचा अपघात झाला असता, तर तो क्रिकेटच्या मैदानापासून लांब गेला असता. RCB चा पराभव टळला असता, असं त्या चाहत्याच म्हणणं होतं.
RCB स्टार प्लेयर्सचा संघ
RCB टीमच्या हातात सर्वकाही असूनही त्यांचा पराभव झाला. त्यांचा मार्ग सोपा होता, फक्त जिंकायच होतं. पण ते सुद्धा झालं नाही. RCB टीम हा स्टार प्लेयर्सचा संघ आहे. 2-3 खेळाडूंवर ते मोठ्या प्रमाणात अवलंबून असतात. किताब जिंकण्यासाठी सांघिक प्रदर्शन आवश्यक आहे.