दुबई : स्फोटक बॅट्समन कायरन पोलार्ड सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. त्याने इंटरनॅशनल T20 लीगमध्ये सलग दुसर अर्धशतक झळकवलय. पण त्याने झळकलेलं अर्धशतक वाया गेलं. पोलार्डने बॅटने कमाल दाखवली. पण त्यांचे बॉलर फ्लॉप ठरले. बॅटने त्याने धुमाकूळ घातला. पण तो आपल्या टीमला लज्जास्पद पराभवापासून वाचवू शकला नाही. MI एमिरेट्सच नेतृत्व करणाऱ्या पोलार्डने डेजर्ट वायपर्सच्या बॉलर्सना चांगलच धुतलं. त्याने लीगच्या 15 व्या सामन्यात सिक्सचा पाऊस पाडताना 67 रन्स केल्या.
पोलार्डने किती सिक्स मारले?
MI एमिरेट्सचा या मॅचमध्ये 7 विकेट्सनी पराभव झाला. एमिरेट्सने निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 5 विकेट गमावून 169 धावा केल्या. पोलार्डशिवाय निकोल्स पूरनने 57 रन्स केल्या. एमिरेट्सचा कॅप्टन पोलार्डने डेजर्टच्या बॉलर्सची जोरदार धुलाई केली. पोलार्डने आपल्या इनिंगमध्ये एक फोर आणि 6 सिक्स मारले.
डेजर्टचा पलटवार
डेजर्टच्या टीमने 3 विकेट्स गमावून 16.3 ओव्हर्समध्ये विजयी लक्ष्य गाठलं. डेजर्टच्या एलेक्स हेल्सने 44 चेंड़ूत नाबाद 62 धावा कुटल्या. शेरफन रदरफॉर्डने 29 चेंडूत नाबाद 56 धावा ठोकल्या. पोलार्डने मागच्या सामन्यातही अर्धशतक झळकवल होतं. दुबई कॅपिटल्स विरुद्ध 38 चेंडूत 86 धावांची तुफानी खेळी केली होती. मागच्या सामन्यातही पोलार्डच्या टीमचा पराभव झाला होता. लीगमध्ये मुंबई इंडियन्सचा हा दुसरा पराभव आहे.
स्टार बॉलर्सचा फ्लॉप शो
डेजर्ट विरुद्ध एमिरेट्सचे बॉलर्स विशेष प्रभावी कामगिरी करु शकले नाहीत. यामध्ये ट्रेंट बोल्ट, ड्वेन ब्राव्हो आणि फारुकी प्रभावहीन ठरले. बोल्टला एक यश मिळालं. त्याने 4 ओव्हर्समध्ये 34 धावा दिल्या. ब्राव्होने 3 ओव्हर्समध्ये 24 रन्स दिल्या. त्याला एकही विकेट मिळाला नाही.
तिसऱ्या स्थानावर MI एमिरेट्स
5 सामन्यात 3 विजय आणि 2 पराभवांसह पोलार्डची टीम मुंबई इंडियन्स एमिरेट्स तिसऱ्या स्थानावर आहे. डेजर्ट वायपर्सची टीम हा सामना जिंकून दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. गल्फ जायंट्स 9 पॉइंट्ससह टॉपवर आहे.