दुबई : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2021) चा दुसरा हंगाम 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) 20 सप्टेंबर रोजी कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. आरसीबीचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) सध्या क्वारंटाईन आहेत. पण इतर बहुतेक खेळाडूंनी सराव सुरू केला आहे.
RCB च्या खेळाडूंनीआपल्याच टीममध्ये दोन भाग करुन सराव सामना खेळला. यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज ए बी डिव्हिलियर्सने वादळी खेळी केली. इंट्रा स्क्वॉड सराव सामन्यात डिव्हिलियर्सने झंझावाती शतक ठोकलं. याशिवाय भारताचा सलामीवीर के एस भरतने 95 धावांचं योगदान दिलं.
क्वारंटाईन असल्यामुळे विराट कोहली आणि मोहम्मद सिराज या सराव सामन्यात खेळू शकले नाहीत. मात्र RCB च्या अन्य खेळाडूंनी आपला हात आजमावून पाहिला. सलामीवीर देवदत्त पडिक्कल, हर्षल पटेल हेही या सराव सामन्यात खेळले. हा सामना RCB A विरुद्ध RCB B यांच्यात खेळला गेला.
हर्षल पटेल RCB A चा कर्णधार होता. तर देवदत्त पडिक्कल RCB B चे नेतृत्व करत होता. हर्षल पटेलने यंदाच्या हंगामात सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत.
हर्षलने टॉस जिंकत प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतला. RCB A ने हा निर्णय सार्थ ठरवला. RCB A ने चार बाद 212 धावा ठोकल्या. यामध्ये एबी डिव्हिलियर्सने घणाघाती 104 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने 10 षटकार आणि 7 चौकार ठोकले.
याशिवाय मोहम्मद अझरुद्दीनने 43 चेंडूत 66 धावांची खेळी केली. तर यंदाच्या लिलावात आरसीबीच्या ताफ्यात आलेल्या के एस भरतने 47 चेंडूत 95 धावा ठोकल्या. पडिक्कल 21 चेंडूत 36 धावा केल्या. RCB A ने हा सामना आपल्या नावे केला.
RCB ने यंदाच्या आयपीएल हंगामात 7 पैकी 5 सामने जिंकले आहेत. गुणतालिकेत कोहलीचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे.
VIDEO :
संबंधित बातम्या