IPL 2021 Auction Highest Paid Players : 5 खेळाडूंवर 69 कोटींची उधळण, लिलावाचे रेकॉर्ड मोडणारे धुरंधर कोण?

| Updated on: Feb 09, 2022 | 9:56 AM

इंडियन प्रीमियर लीग 2022 (Indian Premier League 2022) च्या महा लिलावाला (IPL Mega Auction 2022) फार वेळ नाही. पुन्हा एकदा खेळाडूंवर पैशांचा वर्षाव होणार आहे. आयपीएल हे असे व्यासपीठ आहे जिथे एखाद्या अज्ञात खेळाडूलादेखील कोट्यवधी रुपये मिळतात.

IPL 2021 Auction Highest Paid Players : 5 खेळाडूंवर 69 कोटींची उधळण, लिलावाचे रेकॉर्ड मोडणारे धुरंधर कोण?
IPL Trophy
Follow us on

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग 2022 (Indian Premier League 2022) च्या महा लिलावाला (IPL Mega Auction 2022) फार वेळ नाही. पुन्हा एकदा खेळाडूंवर पैशांचा वर्षाव होणार आहे. आयपीएल हे असे व्यासपीठ आहे जिथे एखाद्या अज्ञात खेळाडूलादेखील कोट्यवधी रुपये मिळतात. आयपीएलच्या गेल्या वर्षीच्या लिलावातदेखील (IPL Auction 2021) असेच काहीसे चित्र पाहायला मिळाले होते. दोन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या एका खेळाडूवर आयपीएलमधील सर्वाधिक बोली लावली गेली. गेल्या वर्षीच्या टॉप 5 सर्वात महागड्या खेळाडूंबद्दल बोलायचे झाले तर त्यात 4 परदेशी आणि एक भारतीय खेळाडू होता. ऑस्ट्रेलियाचे दोन आणि न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि भारताचा प्रत्येकी एक खेळाडू या यादीत होता.

आयपीएल 2021 च्या लिलावात, दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरिसवर सर्वाधिक पैसा खर्च झाला. त्यापाठोपाठ किवी अष्टपैलू क्रिकेटपूट काईल जेमिसन, ऑस्ट्रेलियन खेळाडू झाय रिचर्डसन आणि ग्लेन मॅक्सवेल यांचा समावेश आहे. पाचव्या स्थानावर भारतीय अष्टपैलू खेळाडू कृष्णप्पा गौतम होता जो आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू ठरला आहे.

IPL 2021 मधील टॉप 5 महागडे खेळाडू

1. ख्रिस मॉरिस : आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ख्रिस मॉरिस ठरला होता, ज्याला राजस्थान रॉयल्सने 16.25 कोटी रुपयांना खरेदी केले. मॉरिसने युवराज सिंगचा (16 कोटी) विक्रम मोडला. मॉरिसने आयपीएल 2021 मध्ये 11 सामन्यांमध्ये केवळ 67 धावा केल्या, मात्र गोलंदाजीत त्याने चांगली कामगिरी केली. त्याने संपूर्ण मोसमात 15 विकेट्स घेतल्या.

2. काइल जेमिसन: न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू काइल जेमिसन हा आयपीएल 2021 मधील दुसरा सर्वात महागडा खेळाडू होता. जेमिसनला बंगळुरुने 15 कोटी रुपयांच्या बोलीवर विकत घेतले होते. जेमिसनने या मोसमात खेळल्या गेलेल्या 9 सामन्यांमध्ये 9 विकेट घेतल्या आणि 16.25 च्या सरासरीने फक्त 65 धावा केल्या. यूएई लेगमध्ये, जेमिसनला आरसीबीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नव्हते.

3. ग्लेन मॅक्सवेल : ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल आयपीएल 2021 मधील तिसरा सर्वात महागडा खेळाडू होता. मॅक्सवेलला आरसीबीने तब्बल 14.25 कोटींना खरेदी केले. मागील सर्व हंगामात मॅक्सवेलची कामगिरी खराब होती, परंतु असे असतानाही आरसीबीने या खेळाडूमध्ये मोठी रक्कम गुंतवली आणि हा खेळाडूही संघाच्या विश्वासावर खरा उतरला. मॅक्सवेलने 14 सामन्यांत 45 पेक्षा जास्त सरासरीने 498 धावा केल्या.

4. झाय रिचर्डसन: ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज झाय रिचर्डसनला आयपीएलमध्ये पंजाब किंग्जने 14 कोटी रुपयांना विकत घेतले. रिचर्डसनला केवळ 3 सामन्यात संधी मिळाली. कोरोना व्हायरसमुळे त्याने स्पर्धा अर्ध्यावर सोडली. रिचर्डसनने 3 विकेट घेतल्या आणि त्याचा इकॉनॉमी रेट सुद्धा प्रति षटकात 10 पेक्षा जास्त धावा होता.

5. कृष्णप्पा गौतम: कर्नाटकचा ऑफस्पिनर कृष्णप्पा गौतम 2021 मध्ये 9.25 कोटी रुपयांना विकला गेला. गौतमला चेन्नई सुपर किंग्जने एवढ्या मोठ्या किंमतीत विकत घेतले. तो आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू ठरला. मात्र, त्याला चेन्नई सुपर किंग्जने एकाही सामन्यात आजमावले नाही.

इतर बातम्या

Under 19 World cup: ‘हे’ आहेत वर्ल्डकप गाजवणारे महाराष्ट्राचे चार खेळाडू, गरज असताना मुंबई-पुणेकरांचा जबरदस्त परफॉर्मन्स

IND vs WI: सुर्य कुमार यादवला भडकवणारा तो जोडीदार कोण? मागच्या मॅचमध्ये काय झालं?

तालिबानची दहशत! अफगाणिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ, U19 World Cup टीममधले चौघे मायदेशी परतलेच नाहीत