माझ्या भावाने विराट कोहलीविरुद्ध स्क्रिप्ट लिहिली, धोनीची मोठी प्रतिक्रिया

| Updated on: Sep 25, 2021 | 9:36 AM

धोनी शारजाचा बादशाह कसा झाला, चेन्नईच्या विजयाची स्क्रिप्ट कोणी लिहिली? तर त्याचं उत्तर धोनीने स्वत: दिलं, तो म्हणजे धोनीचा भाऊ. धोनीचा भाऊ RCB विरुद्धच्या विजयात नायक बनला. त्यामुळेच या सामन्यानंतर धोनीने आपल्या या भावाचं तोंडभरुन कौतुक केलं.

माझ्या भावाने विराट कोहलीविरुद्ध स्क्रिप्ट लिहिली, धोनीची मोठी प्रतिक्रिया
Virat-Kohli-And-MS-Dhoni
Follow us on

दुबई : आयपीएलच्या (IPL 2021) मैदानात महेंद्रसिंह धोनीच्या (Dhoni) चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) विराट कोहलीच्या (Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पराभव केला. धोनीच्या चेन्नईने आता गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं आहे. त्यामुळे धोनी आता शारजाचा बादशाह झाला आहे. चेन्नईने RCB चा 6 विकेट्स राखून सहज पराभव केला. RCB चे सलामीवीर विराट कोहली आणि देवदत्त पडीक्कल या दोघांनीही अर्धशतकं ठोकून भक्कम सुरुवात करुन दिली होती. मात्र RCB ला केवळ 157 धावांपर्यंतच मजल मारता आली. मग 158 धावांचं आव्हान घेऊन मैदानात आलेल्या धोनी ब्रिगेडने चार विकेट्सच्या मोबदल्यात हे आव्हान पार केलं.

धोनी शारजाचा बादशाह कसा झाला, चेन्नईच्या विजयाची स्क्रिप्ट कोणी लिहिली? तर त्याचं उत्तर धोनीने स्वत: दिलं, तो म्हणजे धोनीचा भाऊ. धोनीचा भाऊ RCB विरुद्धच्या विजयात नायक बनला. त्यामुळेच या सामन्यानंतर धोनीने आपल्या या भावाचं तोंडभरुन कौतुक केलं. आता धोनीने संघातील खेळाडूला भाऊ म्हटलं आहे तर भावासोबत वाद-विवाद तर आलेच. मात्र धोनीने या वादाचं कारणही सांगितलं.

धोनीचा भाऊ ब्राव्हो

धोनी ज्याला आपला भाऊ म्हणत आहे, तो म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून, तो आहे वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू डी जे ब्राव्हो. ब्राव्हो हा गेल्या अनेक वर्षांपासून धोनीच्या चेन्नईकडून आयपीएलच्या मैदानात उतरतो. सामन्यानंतर धोनीने ब्राव्होचं कौतुक केलं.

धोनी म्हणाला, ब्राव्हो फिट आहे ही आमच्यासाठी चांगली बाब आहे. तो आपल्या डावपेच योग्यरित्या अमलात आणत आहे. मी त्याला माझा भाऊ म्हणतो. आमच्यात नेहमीच ‘स्लोअर बॉल’वरुन वाद होतो. तू स्लो बॉल टाकतो हे सगळ्यांना कळलंय असं मी ब्राव्होला नेहमी सांगतो. त्यामुळेच मी त्याला एका ओव्हरमध्ये 6 बॉल हे वेगवेगळेच असले पाहिजेत हे सुद्धा मी त्याला सांगितलं आहे. जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळाली, तेव्हा तेव्हा त्याने उत्तम कामगिरी केली, असं धोनीने सांगितलं.

3 विकेट्सह ब्राव्हो मॅन ऑफ द मॅच

RCB विरुद्धच्या सामन्यात CSK च्या ड्वेन ब्राव्होने तीन विकेट्स घेतल्या. 4 षटकात 24 धावा देत ब्राव्होने तीन महत्त्वाचे फलंदाज माघारी धाडले. त्यामुळेच RCB ची धावांची गती मंदावली. ब्राव्होच्या या कामगिरीमुळेच त्याला मॅन ऑफ द मॅच अर्थात सामनावीराचा किताब देण्यात आला.

ब्राव्होन रणनीती सांगितली!

दरम्यान, या सामन्यानंतर ब्राव्होने RCB विरुद्ध त्याची रणनीती सांगितली. ब्राव्हो म्हणाला, “बंगळुरु हा एक मजबूत संघ आहे. त्यांच्याकडे विराट कोहलीसारखा खेळाडू आहे. मी अतिशय नियोजनबद्ध गोलंदाजी करण्यावर भर दिला. प्रत्येक बॉलमध्ये व्हेरिएशन ठेवलं. वाईड यॉर्कर, लेग स्टंप यॉर्कर टाकले. त्यामुळे फलंदाज गोंधळून जात होते आणि मला यश मिळत गेलं”

संबंधित बातम्या 

IPL 2021: धोनीच्या चेन्नईसमोर विराटची आरसीबी ढासळली, उत्तम सुरुवातीनंतरही अखेर पराभूत, 6 विकेट्सनी सीएसके विजयी

IPL 2021 Purple Cap: हर्षल पटेल अव्वल स्थानी कायम, अशी आहे नवी यादी