दुबई : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2021) 14 व्या पर्वाचा दुसरा टप्पा आजपासून झाला आहे. पहिलीच मॅच आयपीएलमधील पाच वेळा विजेता संघ मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघांमध्ये खेळवण्यात आली. या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जने मुंबई इंडियन्सवर 20 धावांनी विजय मिळवला आहे. सलामीवीर ऋतुराज गायकवाड चेन्नईच्या विजयाचा हिरो ठरला. (IPL 2021 : CSK vs MI : Ruturaj Gaikwad helps Chennai Super Kings to beat Mumbai Indians)
दोन तुल्यबळ संघांमध्ये अटीतटीचा सामना अपेक्षित होता, मात्र मॅच अगदी एका रोलर कोस्टर राईडप्रमाणे होती. सुरुवातीला संपूर्णपणे मुंबईच्या पारड्यात असणारी मॅच नंतर मात्र चेन्नईने खेचून नेत 20 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात चेन्नईच्या ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) धडाकेबाज अशी नाबाद 88 धावांची खेळी खेळत चेन्नईच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.
नाणेफेक जिंकत चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय मुंबईच्या गोलंदाजांनी चुकीचा ठरवला. चेन्नईचे दिग्गज फलंदाज एका मागोमाग एक बाद होत गेले. फाफ डुप्लेसी आणि मोईन अली शून्यावर बाद झाल्यानंतर रायडूही एकही धाव न करता दुखापतग्रस्त झाला. त्यानंतर रैना 4 आणि धोनी 3 धावा करुन बाद झाले. पण सलामीवीर ऋतुराजने नाबाद 88 धावा ठोकल्या. त्याला जाडेजाने 26 आणि ब्राव्होने 23 धावांची मदत करत मुंबईसमोर 157 धावांचे लक्ष्य ठेवले.
— Simran (@CowCorner9) September 19, 2021
ऋतुराजने 58 चेंडूत 7 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 88 धावा चोपल्या, त्याने सुरुवातीला संयमी फलंदाजी केली. 40 धावांचा टप्पा ओलांडल्यानंतर त्याने मुंबईच्या प्रत्येक गोलंदाजाची धुलाई केली. मुंबईचे दोन महत्त्वाचे गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट या दोघांवरही गायकवाडने प्रहार केला. मातब्बर गोलंदाजांची गोलंदाजी फोडून काढत गायकवाडने दुबईत दबंगगिरी केली. दरम्यान, सामन्यानंतर ऋतुराज गायकवाडला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
8⃣8⃣* Runs
5⃣8⃣ Balls
9⃣ Fours
4⃣ SixesICYMI: @Ruutu1331 was on a roll with the bat and played a fine knock. ? ? #VIVOIPL #CSKvMI @ChennaiIPL
Watch that innings ? ?https://t.co/50DmRGDtAk
— IndianPremierLeague (@IPL) September 19, 2021
मुंबईला 157 धावांचे आव्हान होते. जे त्यांच्यासारख्या दिग्गज संघासाठी तितके अधिक नव्हते. पण कर्णधार रोहित आणि अष्टपैलू हार्दीक पंड्याच्या अनुपस्थितीत सर्वच फलंदाज गारद पडले. मुंबई इंडियन्सच्या एकाही फलंदाजाला खास कामगिरी करता आली नाही. सौरभ तिवारीने अर्धशतक झळकावलं असलं तरी त्याने अत्यंत धिम्यागतीने फलंदाजी केली ज्यामुळे तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. अखेर मुंबईचा संघ 20 धावांनी पराभूत झाला आहे.
इतर बातम्या
IPL 2021: विराटचा आणखी एक मोठा निर्णय, यंदाच्या आयपीएलनंतर आरसीबीचं कर्णधारपदही सोडणार
IPL 2021: मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग सामन्यात रोहित का नाही?, पोलार्डने सांगितलं कारण
PHOTO: IPL मध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारे फलंदाज, एका दिग्गज कर्णधाराचाही समावेश
(IPL 2021 : CSK vs MI : Ruturaj Gaikwad helps Chennai Super Kings to beat Mumbai Indians)