मुंबई : महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईने कोलकात्याचा 27 धावांनी पराभव करत चौथ्यांदा आयपीएलचं विजेतेपद पटकावलं. कोलकात्याची सलामीची जोडी वगळता एकही फलंदाज मोठा डाव खेळू शकला नाही, ज्यामुळे त्यांना पहिल्यांदाच अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला. त्याचवेळी, कोलकात्याचा एकही फलंदाज अजिबातच लयीत दिसला नाही. दिनेश कार्तिक… कोलकात्याच्या संघातलं मोठं नाव… एक विकेटकीपर फलंदाज म्हणून जगप्रसिद्ध… अनेक धुव्वाधार खेळींसाठी ओळख पण त्याचा करिश्मा यंदाच्या आयपीएल पर्वात काही दिसला नाही. फलंदाज एकही मोठी खेळी तो खेळू शकला नाही, अशा स्थितीत त्याच्या कारकीर्दीला ब्रेक लागण्याची शक्यता आता वर्तवली जाऊ लागली आहे.
कोलकात्याचा दिग्गज फलंदाज दिनेश कार्तिक आयपीएल 2021 मध्ये कोणतीही मोठी खेळी खेळू शकला नाही. दिनेश कार्तिकने आयपीएल 2021 मध्ये 16 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 23.77 च्या सरासरीने आणि 131.28 च्या स्ट्राईक रेटने फक्त 223 धावा केल्या आहेत. आश्चर्य म्हणजे तो एकही अर्धशतक करू शकला नाही. कार्तिकनेही अतिशय संथ गतीने धावा केल्या आहेत. गेल्या अनेक मोसमांपासून त्याची बॅट शांत आहे. पण आता वाढत्या वयाचा प्रभाव त्याच्या खेळावरही दिसून येत आहे, तो 36 वर्षांचा झाला आहे.
कार्तिक धावांचा भूकेला आहे. धावा करण्यासाठी तो संघर्ष करतो आहे. पुढच्या वर्षी आयपीएलचा लिलाव पार पडतो आहे. या लिलावात वय वाढलेल्या खेळाडूंना अनेक संघ घेण्याचं टाळतील. वाढलेलं वय आणि त्याचा कामगिरीवर झालेला परिणाम याचा फटका अनेक दिग्गजांनाही बसणार आहे. कार्तिकलाही तो बसेल. आयपीएल 2020 च्या मध्यातच त्याने कर्णधारपदही सोडले होते जेणेकरून तो त्याच्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करू शकेल. त्याने आयपीएलमध्ये 4000 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
हे ही वाचा :
IPL चं पुढचं पर्व MS धोनी खेळणार का?, जगाला पडलेल्या प्रश्नाचं धोनीने उत्तर दिलं!
IPL 2021 Final: चेन्नई फॅन्सचा आनंद गगनात मावेना, केकेआरला मात देत चौथ्यांदा कोरलं ट्रॉफीवर नाव